Asian Academy Creative Awards: विजयची 'दहाड' जगाने ऐकली! सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर कोरलं नाव

विजय वर्माने 'दहाड' मधील सिरीयल किलरच्या भुमिकेसाठी आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे.
Vijay Varma Wins  Asian Academy Creative Awards
Vijay Varma Wins Asian Academy Creative AwardsEsakal

Vijay Varma Wins Asian Academy Creative Awards: गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून विजय वर्मा याने आपलं स्थान निर्माण केलं आहे . अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट आणि नकारात्मक भूमिका साकारून त्याने लोकप्रियता मिळवली आहे.

आलिया भट्टसोबतच्या डार्लिंग आणि दहाड या चित्रपटानंतर लाईमलाईटमध्ये आलेल्या विजयने अनेक धमाकेदार सिरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Vijay Varma Wins  Asian Academy Creative Awards
Mission Raniganj Oscar Entry : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' ही ऑस्करला जाणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

दिग्दर्शक सुजॉय घोष दिग्दर्शित 'जाने जान' या चित्रपटामुळे अभिनेता विजय वर्मा चर्चेत आहे. त्यातच आता विजय वर्माने चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेयर केली आहे. ज्यानंतर विजयवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजय वर्माला आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील 'दहाड' वेब सिरिजमध्ये विजयने सिरियल किलरची उत्तम भूमिका साकरली आहे. या सिरिजमधील त्याच्या भुमिकेसाठी विजयने आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जिंकला आहे.

Vijay Varma Wins  Asian Academy Creative Awards
Dunki Vs Salaar: प्रभाससमोर बादशाह झुकला! सलारशी टक्कर टाळण्यासाठी शाहरुखने 'डंकी'ची रिलिज डेट ढकलली पुढे


भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल विजय वर्मावर चाहत्यांसह कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ही बातमी चाहत्यांसोबत शेयर करत विजयने एक खास पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली आहे. एक्सेल मूव्हीज, प्रोडक्शन बॅनर ज्यांनी Amazon प्राइम व्हिडिओवर हा शो तयार केला आहे, त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेयर केली.

एक्सेल मूव्हीजच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, "एशियन अकादमी अवॉर्ड्समध्ये दहाडसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा अवॉर्ड्स जिंकल्याबद्दल विजय वर्माचे अभिनंदन."

हा लोकप्रिय पुरस्कार जिंकल्यानंतर विजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर प्रोडक्शन बॅनरची अधिकृत पोस्ट शेयर केली आणि एवढा मोठ्या सन्मानासाठी आशियाई अकादमीचे आभार मानले.

Vijay Varma Wins  Asian Academy Creative Awards
Saba Azad Video: "तुला थेरपीची गरज" म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सबानं दिलं जबराट उत्तर म्हणाली...

विजय वर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर तो होमी अदजानियाच्या 'मर्डर मुबारक' आणि 'अफगानी' मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर तो करीना कपूरसोबत दिग्दर्शक हंसल मेहताच्या 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये देखील काम करणार आहे.

याशिवाय रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' आणि 'द क्रू'साठी तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझसोबत विजय शूटिंग करत आहे.

विजय Amazon प्राइम व्हिडिओवरील सिरिज 'मिर्झापूर' च्या तिसऱ्या सीझनमध्ये भरत त्यागी आणि शत्रुघ्न त्यागी अशा लोकप्रिय दुहेरी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com