खाली पडल्यावरही पुन्हा घोड्यावर स्वार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील "पेशवा बाजीराव' मालिकेतील राधाबाई ऊर्फ बाजीरावांच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुजा साठे चित्रीकरण सुरू असताना घोड्यावरून खाली पडली. तिला दुखापत झाली. तरीही तिने हा सिक्वेन्स पूर्ण केला. सूत्रांच्या माहितीनुसार- अनुजाने सिक्वेन्ससाठी योग्य पद्धतीने घोडा पळवायला सुरुवात केली होती; पण अचानक घोडा खूपच वेगाने धावू लागला. घोड्यावरचे नियंत्रण सुटून ती खाली पडली. वैद्यकीय उपचारांनंतर ती पुन्हा घोड्यावर स्वार झाली आणि तिने उत्तम परफॉर्मन्स दिला. तिची कामावरील निष्ठा पाहून उपस्थितांनी तिचे खूप कौतुक केले. 

Web Title: The horse fell down again raises up

टॅग्स