विराट आणि प्रियंका इंस्टाग्रामवरून कमवतात ''एवढे कोटी''

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म' हे बहुतेक लोकांसाठी  कमाईचे साधन बनले आहेत. इन्स्टाग्राम सुद्धा असेच एक महत्त्वाचे  'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म' आहे. काही सेलिब्रिटींसाठी 'इंस्टाग्राम' फक्त एक व्यक्त होण्याचे व्यासपीठ नसून यातूनच त्यांची चांगली कमाई देखील होते. तुम्हाला याची माहिती इ्न्स्टाग्राम रिच लिस्टवरून मिळते. 

'सोशल मीडिया' हे 'प्लॅटफॉर्म' खूप जणांसाठी कमाईचे साधन बनलेले आहे. 'इंस्टाग्राम' देखील यातील महत्त्वाचे 'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म' आहे. 'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म'चा वापर आजकाल अनेक कारणांसाठी होतो. याद्वारे यावर तुम्ही तुमची कला दाखवू शकता किंवा मतं मांडू शकता.  

'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म' हे बहुतेक लोकांसाठी  कमाईचे साधन बनले आहेत. इन्स्टाग्राम सुद्धा असेच एक महत्त्वाचे  'सोशल मीडिया' 'प्लॅटफॉर्म' आहे. काही सेलिब्रिटींसाठी 'इंस्टाग्राम' फक्त एक व्यक्त होण्याचे व्यासपीठ नसून यातूनच त्यांची चांगली कमाई देखील होते. तुम्हाला याची माहिती इ्न्स्टाग्राम रिच लिस्टवरून मिळते. 

2020 च्या 'इंस्टाग्राम' 'रिच लिस्ट'मध्ये पहिल्या10 मध्ये कोणत्याही भारतीय सेलिब्रिटीचे नाव नाही आहे, पण क्रिकेटपटू विराट कोहली 26व्या, तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही  28 व्या स्थानावर आहे. 'अमेरिकन कॅनडियन' अभिनेता ड्वेन जॉनसनला यादीत पहिले स्थान आहे. तो एका 'पोस्ट'च्या माध्यमातून 7.6 कोटी रुपये कमावतो. कोहलीचे 'इंस्टाग्राम'वर 64.2 'मिलियन फॉलोअर्स' आहेत आणि तो एका पोस्टमधून जवळपास 2.21 कोटी रुपये कमावतो. दुसरीकडे प्रियांका चोप्राचे 'इंस्टाग्राम'वर 54.30 'मिलियन फॉलोअर्स' आहेत आणि ती जवळपास 2.18 कोटी रुपये प्रत्येक पोस्टसाठी कमावते.

'इंस्टाग्राम' हे काम कसे करते ?
जर विराट कोहलीचे 64 'मिलियन'पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जर त्याने 'इंस्टाग्राम'वर कोणत्याही प्रोडक्टचा प्रचार केला तर, ते 'प्रोडक्ट' थेट 64 'मिलियन' लोकांपर्यंत पोहोचेल.  जाहिरातीचा हा एक प्रकार आहे. ज्यामध्ये 'सेलिब्रिटी इंफ्लूएन्स' 'मार्केटिंग'द्वारे ते उत्पादन खरेदी किंवा ग्राहकांच्या पसंतीस उतरते यामध्ये 'फिचर्स पोस्ट'चे पैसे मिळतात. 'इंस्टाग्राम' यामध्ये 'सेलिब्रिटीं'ना पैसे देत नाही तर त्या 'ब्रँड'कडून पैसे दिले जातात ज्याला हे 'सेलिब्रिटी प्रमोट' करतात.

'इंस्टाग्राम'वर प्रमोशनची विशेष बाब म्हणजे ते एकदम नैसर्गिक वाटते. म्हणजे टीव्हीवर तुम्ही ज्या जाहिराती पाहता, तेव्हा तुम्हाला माहित असते की, त्या जाहिराती आहेत. मात्र 'इंस्टाग्राम'वर एखाद्या सेलिब्रिटीने पोस्ट केल्यास ती जाहिरात न वाटता केवळ एक 'सोशल मीडिया' 'पोस्ट' वाटते. त्याचप्रमाणे त्यांच्या 'फॉलोअर्स'ना असे देखील वाटते की, 'सेलिब्रिटी' हे 'प्रॉडक्ट' वापरत आहेत, म्हणजे त्यामध्ये काहीतरी खास असणार.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

या 'इंस्टाग्राम'वर फक्त सेलिब्रिटीच नाही तर, आपल्यासारखी सामान्य माणसं देखील पैसे कमावू शकतात. फक्त तुमचे फॉलोअर्स जास्त असायला हवेत. त्याचप्रमाणे कोणाचे 'प्रमोशन' करता येईल हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ती एक 'मार्केटिंगची टेक्निक' आहे.  

'इंस्टाग्राम' 'फॉलोअर्स' वाढवण्यासाठी ...... 
'इंस्टाग्राम'वर तुमचे 'फॉलोअर्स' वाढवण्यासाठी उत्तम 'कंटेट', योग्य असे 'हॅशटॅग्स' आणि चांगले 'फोटो' किंवा 'व्हिडीओ' या सर्व गोष्टीचे काळजीपूर्वक पालन करायला हवे. तसेच तुम्हाला 'इंस्टाग्राम'वर असणाऱ्या विशिष्ट 'थीम्स', 'फिल्टर' यांचे देखील ज्ञान असणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how do celebrities such as virat kohli and priyanka chopra earn from instagram post