Hrishikesh Joshi: येतोय तो खातोय.. असं का म्हणाला हृषिकेश जोशी..

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखडपणे होणार टीका..
Hrishikesh Joshi direct new marathi drama play yetoy to khatoy cast santosh pawar bhargavi chirmule swapnil rajshekhar
Hrishikesh Joshi direct new marathi drama play yetoy to khatoy cast santosh pawar bhargavi chirmule swapnil rajshekharsakal

Hrishikesh Joshi new marathi play yetoy to khatoy: अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी यांचा राजकीय आणि सामाजिक दांडगा व्यासंग सर्वश्रुत आहे. सद्य परिस्थितीवर नेमकी टिप्पणी करत घटनेच्या अचूक वर्मावर बोट ठेवत निडरपणे सत्य मांडण्याची ताकत त्यांच्यात आहे.

असंच एक सत्य मांडत, हृषिकेश जोशी म्हणतायत.. 'येतोय तो खातोय'... ते असं का म्हणतायेत? या मागेही एक खास कारण आहे.

(Hrishikesh Joshi direct new marathi drama play yetoy to khatoy cast santosh pawar bhargavi chirmule swapnil rajshekhar)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल


विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश दिग्दर्शित 'येतोय तो खातोय' ही धम्माल विनोदी नाटक आपल्या भेटीला येणार आहे. येत्या ९ फेब्रुवारीला त्याचा पहिला प्रयोग होणार आहे.

लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये दडलेल्या ‘येतोय तो खातोय’ या आधुनिक लोकनाट्याची भेट नाटयरसिकांसाठी आणली आहे, 'सुयोग' नाट्य संस्थेने. 'सुयोग'ची ही ९०वी कलाकृती आहे.

लोकनाट्याच्या संस्कृतीत नीतीतत्त्वांचा बोध, आदर्शांची जाणीव करून देताना विनोदाच्या माध्यमातून लोकांच्या प्रवृत्तींवर, मर्मावर बोट ठेवणे व सद्विचारांची जाणीव जागृती करण्याचे काम प्रामुख्याने केले जाते. 'येतोय तो खातोय' या नाटकातूनही ६ दमदार गाण्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करण्यात येणार आहे.

Hrishikesh Joshi direct new marathi drama play yetoy to khatoy cast santosh pawar bhargavi chirmule swapnil rajshekhar
Vishakha Subhedar: गरज सरो वैद्य मरो.. हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारची 'ती' पोस्ट नेमकी कुणासाठी..

राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार घेताना गोष्टीच्या माध्यमातून राजकीय हेवेदावे गमतीशीर व तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार लेखक विजय कुवळेकर यांनी या नाटकातून केला आहे. पॉलिटिकल सटायर असलेल्या या नाटकातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे.

या नाटकाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी सांगतात की, ‘सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून मनोरंजनाच्या माध्यमातून 'राजकीय पोलखोल' केली जाणार आहे’. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे.

हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले,अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर हे कलाकार ‘येतोय तो खातोय’ नाटकात आहेत. नाटकाचे संगीत अजित परब यांचे तर नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून प्रकाशयोजना प्रफुल दीक्षित यांची आहे. वेशभूषा महेश शेरला तर रंगभूषा शरद सावंत यांची आहे. दिग्दर्शन साहाय्य श्रद्धा पोखरणकर यांचे आहे.

संदेश सुधीर भट सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे निर्माते कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com