हृतिक रोशनवर का आली छोट्या दोस्तांना आवाहन करण्याची वेळ?

hritik
hritik

मुंबई- देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना घरातंच राहण्याचं वारंवार आवाहन करत आहेत..त्यातंच आता बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या चाहत्यांसाठी खास आवाहन केलं आहे..त्याने हे आवाहन त्याच्या लहानग्या चाहत्यांसाठी केलं आहे..हा व्हिडिओ शेअर करताना त्याने म्हटलंय की, 'आता लहान मुलांनाच पुढे यावं लागणार आहे..'

हृतिक रोशनने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तो असं सांगतोय की, 'घरातल्या लहान मुलांना त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे..त्यांना घरातल्या मोठ्या माणसांना आता हे समजवावं लागणार आहे की घराबाहेर जाण्यात काहीच अर्थ नाहीये...

'हृतिक म्हणतोय, 'मुलांनो आता मला तुमची मदत लागणार आहे..मला असं वाटतं की तुमच्या मदतीनेच आपण कोरोनाला हरवू शकू..काही मोठी माणसं आहेत जी केवळ म्हणायला मोठी आहेत आणि ती कोणाचंही ऐकत नाहीत..ही मोठी माणसं फक्त तुमचंच ऐकतात..म्हणूनंच आता तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची आहे आणि त्यांना समजवायचं आहे की कोरोनाला घरात राहुन हरवलं पाहिजे..'

याआधीही अनेकवेळा हृतिक लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करताना दिसून आला आहे..याआधी हृतिकने बीएमसी कर्मचा-यांना मास्क देखील दिले होते..

त्याने ही माहिती शेअर करत म्हटलं होतं की 'अशा कठीण परिस्थितीत आपल्याला समाज आणि त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जे काही करता येऊ शकतं ते सगळं केलं पाहिजे. मी एन-९५ आणि एफएफपी ३ मास्क बीएमसी कर्माचारी आणि इतर देखरेख करणा-यांसाठी खरेदी केले आहेत..'

hrithik roshan asks children to comeout and stop elders to go out  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com