जगातील सर्वांत हँडसम पुरुषांत हृतिक तिसरा

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

हृतिक रोशनने हॉलिवूडमधील अभिनेता ब्रॅड पिट व जॉन डेप यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत तो जगातील तिसरा सर्वात देखणा पुरुष बनला आहे.

'हँडसम हंक' हृतिक रोशनच्या 'लुक्स'बद्दल त्याच्या चाहत्या तरुणींसह सर्वत्रच चर्चा असते. बॉलिवूडमधील त्याचा हा 'हॉटनेस' आता जागतिक पातळीवरही फेवरीट ठरलाय. जगातील सर्वांत देखण्या पुरुषांच्या यादीत हृतिकने तिसरे स्थान मिळविले आहे. 

'वर्ल्ड्स टॉप मोस्ट' या सर्वेक्षण संकेतस्थळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत हृतिक रोशनने हॉलिवूडमधील अभिनेता ब्रॅड पिट व जॉन डेप यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत तो जगातील तिसरा सर्वात देखणा पुरुष बनला आहे. सलमान खानला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जगभरातील सौंदर्यवान पुरुषांमधून हृतिकची झालेली निवड बॉलिवूडकरांसाठी प्रेरणादायी आहे. हॉलिवूडसह जगभरातील अभिनेते या स्पर्धेत होते. सलमान खानही या यादीमध्ये होता. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ या यादीत अव्वल स्थानावर तर रॉबर्ट पॅटीन्सन दुसऱ्या स्थानावर राहिला.

पहिल्या टॉप टेन विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
1) टॉम क्रूझ
2) रॉबर्ट पॅटीन्सन
3) हृतिक रोशन
4) जॉनी डेप
5) टॉम हिड्डलस्टन
6) ओमर बोर्कन अल गाला
7) सलमान खान
8) ब्रॅड पिट
9) ह्यूग जॅकमन
10) बिल्ली अंगर

Web Title: hrithik roshan becomes world's third most handsome face