Hrithik Roshan,Saba Azad
Hrithik Roshan,Saba AzadGoogle

अखेर हृतिकनं सबाचा हात हातात धरून दिली 'त्या' गोड नात्याची कबुली

या दोघांच्या रोमॅंटिक डिनर डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला (Hrithik Roshan) शुक्रवारी अभिनेत्री सबा आजाद(Saba Azad) हिच्यासोबत पुन्हा डिनर डेटसाठी स्पॉट केलं गेलं. त्या दोघांना मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं. यावेळी हृ्तिकनं सबाचा हात हातात धरला होता. दोघेही मीडिया फोटोग्राफरच्या गर्दीतून रस्ता काढत आपल्या गाडीत बसून निघून गेले. हृतिकचा सबासोबतच्या डिनर डेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Hrithik Roshan,Saba Azad
अमिताभ बच्चन यांचा नातू अनं शाहरुखच्या लेकीचं अखेर ठरलं?

त्याच्या चाहत्यांनीही या व्हिडीओला मोठ्या उत्साहात शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मात्र मिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. हृतिक आणि सबाच्या नात्याला घेऊन प्रत्येक जण वेगवेगळे विचार मांडताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की सबा आणि हृतिक रेस्टॉरंटमध्ये हसत-हसत मजा-मस्ती करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलंय की,'हे दोघे रीलेशनशीपमध्ये आहेत का?' तर कुणी लिहिलंय,'हे दोघे डेटिंग करत आहेत का?' या व्हिडीओमुळए नेटकऱ्यांना मात्र अनेक प्रश्न या दोघांना घेऊन पडले आहेत.

हृतिक आणि सबा याआधीही काही दिवसांपूर्वी एकत्र नजर आले होते. खरंतर हृतिक आणि सुझेन खानं हे दोघे जवळ-जवळ चौदा वर्ष एकत्र होते. त्यांचं २००० साली लग्न झालं अन् २०१४ साली दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत,हृहान आणि हृदान. गेली अनेक वर्ष हृतिक सिंगल म्हणूनच आयुष्य जगत होता पण आता अनेक वर्षांनी हृतिक सबा आजादला डेट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा सबाला हृतिक सोबतच्या तिच्या नात्यावरनं प्रश्न विचारला गेला तेव्हा तिनं त्याचं उत्तर देणं टाळलं. ना तिनं या प्रश्नाचं उत्तर 'हो' म्हणून दिलं ना 'नाही' म्हणून दिलं. यावरून नक्कीच अंदाज लावला जात आहे की हृतिक आणि सबामध्ये काहीतरी शिजतंय,लवकरच हे दोघे आपल्या नात्याचा स्विकार करतील असे अंदाजही लावले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com