हृतिकची गर्लफ्रेंड सबानं लांबसडक केस केले दान;सुझैन खाननेही केलं कौतूक

सबा आणि सुझैन नेहमीच एकमेकींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसतात.
Saba Azad, Hrithik Roshan, Sussanne Khan
Saba Azad, Hrithik Roshan, Sussanne KhanGoogle

गेल्या काही दिवसांपासून हृतिक(Hrithik Roshan) आणि सबा(Saba Azad) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. ते अनेकदा लंच आणि डिनर डेटला हातात हात घालून थेट मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालेले दिसले. आता यावर दोघांनीही स्पष्टिकरण दिलं नसलं तरी 'समझने वाले को इशारा काफी है'. सबा आझाद अभिनेत्री असण्यासोबत उत्तम गायिका देखील आहे. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. नुकताच तिनं तिचा न्यू हेअर कट केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिचा लूक हा एकदम टॉमबॉय सारखा आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सबाच्या व्हिडीओवर सुझैनने देखील प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुझैन आणि सबा नेहमीच एकमेकींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत असतात.

सबासोबत हृतिक रीलेशनशीपमध्ये असल्याची बातमी असली तरी सुझैनसोबत देखील सबा एक चांगलं बॉन्ड शेअर करते. सबानं न्यू हेअर कटचा व्हिडीओ शेअर केला आहे. म्हटलं जात आहे की तिनं सिनेमाच्या स्क्रीन टेस्टसाठी हा लूक केला आहे. तिनं त्या पोस्टवर लिहिलंय,''मला स्क्रीन टेस्ट द्यायला आवडतं. मला कळत नाही लोकांना स्क्रीन टेस्ट देणं का आवडत नाही. मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना स्वतःमध्ये केलेला बदल उत्साह देतो,कारण प्रत्येक वेळा आपण आपल्याला नव्यानं सापडतो,नव्यानं भेटतो. माझ्या डोक्यात नेहमीच काहीतरी हटके,वेगळं करण्याविषयी विचार सुरु असतात,जे मला आनंद देऊन जातात''.

Saba Azad, Hrithik Roshan, Sussanne Khan
Video: कंगनाच्या 'लॉकअप' मधील स्पर्धकांवर आलीय उपासमारीची वेळ

सबानं पोस्ट केलेल्या व्हिडीओवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खाननं कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केलेयत. तिनं लिहिलंय,''मला तुझा न्यू लूक खूप आवडला''. त्यावर सबानं लिहिलंय,''सूझ....खरंच तुला आवडला?''. या त्या दोघींच्या संवादानंतर सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगलीय ती सबानं सुझैनला दिलेल्या नवीन नावाची. आज हृतिक आणि सुझैन खान भले विभक्त झाले असले तरी त्यांनी एकमेकांमधील मैत्री जपली आहे. आपल्या दोन मुलांसाठी ते नेहमी व्हॅकेशन एन्जॉय करताना देखील दिसतात. त्यात आता सबासोबतचं सुझैनचं बॉन्ड पाहून नेटकरी नेहमीच तिघांचं कौतूक करीत असतात.

Saba Azad, Hrithik Roshan, Sussanne Khan
मुलीच्या शरीरावर टीका करणाऱ्यांना श्वेता तिवारीचा पलटवार

सबानं पोस्ट केलेल्या व्हिडीओवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खानंनं कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केलेयत. तिनं लिहिलंय,मला तुझा न्यू लूक खूप आवडला. त्यावर सबानं लिहिलंय,सूझ....खरंच तुला आवडला? या त्या दोघींच्या संवादानंतर सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगलीय ती सबानं सुझैनला दिलेल्या नवीन नावाची. आज हृतिक आणि सुझैन खान भले विभक्त झाले असले तरी त्यांनी एकमेकांमधील मैत्री जपली आहे. आपल्या दोन मुलांसाठी ते नेहमी व्हॅकेशन एन्जॉय करताना देखील दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com