शेवटी चोरी पकडलीच! साबानंच ऋतिकला म्हटलं 'माय लव'|Hrithik Roshan Girlfriend Saba Azad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Girlfriend Saba Azad

शेवटी चोरी पकडलीच! साबानंच ऋतिकला म्हटलं 'माय लव'

Bollywood News: बॉलीवूडचा क्रिश पहिला सुपरहिरो अशी ज्याची ओळख चाहत्यांना आहे त्या ऋतिक रोशनच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला (Bollywood Actor) होता. ऋतिकला दोन अपत्यं आहेत. सध्या तो एका त्याच्या मैत्रिणीला डेट करत असल्याचे दिसून आले आहे. ऋतिकनं आपल्या त्या मैत्रिणीच्या नावाचा अनेकदा उल्लेख टाळला आहे. निदान सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडियावर अद्याप त्यानं तिच्याविषयी मैत्रीण असेच शब्द वापरले आहेत. यासगळ्यात मात्र त्याच्या मैत्रीणीनं त्याला चक्क माय लव अशा शब्दांत हाक मारत आपलं प्रेम जगजाहिर केलं आहे. त्या अभिनेत्रीच्या पोस्टनं चाहत्यांकडून ऋतिकवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. रॉकेट बॉईजमधून सबा आझाद नावाची अभिनेत्री प्रकाशझोतात आली. बघता बघता तिनं ऋतिकला आपल्या जाळ्यातही ओढलं.

सबा आझादनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ऋतिकविषयीच्या नात्याला वेगळा रंग दिला आहे. तिनं माय लव असा उल्लेख करुन गेल्या काही महिन्यांपासून ज्या नात्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती, त्यांना गोड बातमी दिली आहे. ऋतिक आणि साबाचे फिरतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. ऋतिकच्या कुटूंबियासमवेत तिनं लंच घेतल्याचेही सांगण्यात आले होते. सबा आझानं आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देत ऋतिक रोशनबरोबरच्या रिलेशनशिपविषयी भाष्य केलं आहे. जे दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना आवडलं आहे. ऋतिकनं त्याच्या पोस्टमधून, मुलाखतीतून सबा ही आपली गर्लफ्रेंड नसून मैत्रिण असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कित्येक चाहत्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. आता त्याची मैत्रीण सबा हिच माय लव म्हणून सांगते तेव्हा मात्र नेटकऱ्यांना कोण कुणाचे कोण....हे कळण्यास वेळ लागलेला नाही.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

हेही वाचा: Viral Video: उर्फी जावेदला अश्लील सिनेमा शूट करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सबा आणि ऋतिक हे एकमेकांना डेट करत आहे. सबानं रॉकेट बॉईजमध्ये एक महत्वाची भूमिकाही साकारली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दोन महान भारतीय शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, होमी भाभा यांच्या आयुष्यावर आधारित या वेबसीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सोनी लिव्ह ओटीटीवर ही मालिका प्रदर्शित झाली होती. सबानं तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी देखील यावेळी सांगितलं आहे. ती मिनिमम या चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

Web Title: Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Share My Love Post On Relationships Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top