esakal | हृतिक रोशनचे लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण 
sakal

बोलून बातमी शोधा

hritik roshan

बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदूकोण नंतर आता हृतिक रोशन देखील हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय.

हृतिक रोशनचे लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदूकोण नंतर आता हृतिक रोशन देखील हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. कॅलिफोर्नियामधीसल एका एजंसीने हृतिकला साईन केल्याची चर्चा आहे..या एजन्सीचं नाव Gersh Agency असं आहे..

हृतिकने 'सुपर ३०' आणि 'वॉर' हे दोनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट दिल्यानंतर चाहत्यांना आता त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे..आंतरराष्ट्रीय पोर्टल डेडलाईनने दिलेल्या माहितीनुसार, 'हृतिक खूप मेहनती आहे..गेल्या 20 वर्षांपासून तो भारतीय सिनेसृष्टीला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतोय..आणि आम्ही आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय चित्रपट सृष्टीला अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत' असं Gersh Agency कंपनीच्या मॅनेजर अमृतांनी म्हटलंय.. Gersh Agency कंपनीच्या मॅनेजर अमृता सेन भारतातील KWAN या कंपनीसोबत काम करत आहेत..

हे ही वाचा: आ रही है पुलिस म्हणत, सुर्यवंशी, सिंघम, सिंबाचा दंगा

हृतिकच्या 2019 मधील 'वॉर' आणि 'सुपर 30' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर लवकरच त्याचा क्रिश 4 हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...त्यातच आता हॉलीवूडमध्ये देखील हृतिक काय कमाल करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणारे..


hrithik roshan has plans for hollywood signed by us agency gersh

loading image
go to top