Vikram vedha remake : हृतिक रोशन करतोय पुण्यात चित्रीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hrithik as vedha in vikram vedha film

Vikram vedha remake : हृतिक रोशन करतोय पुण्यात चित्रीकरण

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक विक्रमी चित्रपट म्हणजे 'विक्रम वेधा' (vikram vedha). सध्या हा चित्रपट हिंदीत कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. विक्रेम आणि वेधा या दोन महत्वाच्या पात्रांवर बेतलेला चित्रपट लवकरच हिंदीत येणार असल्याची घोषणा नुकतीच झाली. विशेष म्हणजे अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan)आणि सैफ अली खान (saif ali khan) हे दोन आघाडीचे अभिनेते या चित्रपटात विक्रम आणि वेधाचे पात्र साकारणार आहे. त्यापैकी वेधाची भूमिका हृतिक रोशन करणार आहे. त्यासंदर्भात त्याने स्वतःच माहिती दिली.

हेही वाचा: Photo : हा शर्ट घालून प्रिया बापटने केलाय राडा..

नुकताच त्याने एक फोटो शेअर करून तो वेधा (vedha) हे पात्र साकारत असल्याचे सांगितले. त्याने वेधाच्या भूमिकेतील एक फोटो शेअर करून त्याला "calm over chos #channelingvedha." असे कॅप्शन दिले आहे. यावरून ही भूमिका आव्हानात्मक असल्याचे तो म्हणाला आहे. (vikram vedha remake) विक्रम वेधा हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. एका कुख्यात गुंडाचा शोध घेऊन त्याला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मिशनभोवती हा चित्रपट गुंफला गेला आहे. राधिका आपटे आणि रोहित सराफ देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असतील.

सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून शनिवारी हृतिक चित्रीकरणासाठी पुण्यात आला होता. पुणे विद्यापीठात हे चित्रीकरण सुरु होते. यावेळी हृतिक सोबत प्रचंड पोलिसांचा ताफा पाहायला मिळाला. हा कदाचित चित्रीकरणाचाच एक भाग असून चित्रपटाचा काही भाग पुणे (shooting in pune) विद्यापीठात चित्रित केला जाणार असल्याची माहिती आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hrithik Roshan In Pune For Shooting Of Vikram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top