ऋतिक रोशन हॉलीवूडच्या  ''स्पाय''  चित्रपटात

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

अमेरिकेच्या एका स्टुडिओमध्ये काही कलाकारांची ऑडिशन पार पडली आहे. ऋतिकने त्याच्या राहत्या घरातून ऑडिशन रेकॉर्ड स्वरुपात पाठवली आहे. यासाठी ऋतिकला त्याच्या टीमकडून त्यासंबंधीचे डिटेल्स देण्यात आले होते.

मुंबई - चाहत्यांना आपल्या चित्रपटाची बराच काळ वाट पाहायला लावणा-या ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट एका खास विषयावर आधारलेला आहे. त्यात त्याची भूमिकाही थोडी वेगळ्या स्वरुपाची असणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हॉलीवूडचा असून त्यातून ऋतिकची इंट्री होणार आहे. त्याच्या या चित्रपटातील वेगळ्या लूकची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋतिकच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती समोर आली आहे. जवळपास आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ऋतिकने अमेरिकन मॅनेजमेंट कंपनी जर्स एजन्सी बरोबर करार केला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हॉलीवूडची दारे उघडली गेली आहेत. आता ऋतिक ज्या चित्रपटात त्यात तो एका स्पायच्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तो चित्रपट क्राईम, थ्रिलर, प्रकारातला असून यासाठी ऋतिकची स्क्रीन टेस्टही घेण्यात आली आहे.

याशिवाय एक नामांकित कंपनी या चित्रपटाची निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असणार ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका स्टुडिओमध्ये काही कलाकारांची ऑडिशन पार पडली आहे. ऋतिकने त्याच्या राहत्या घरातून ऑडिशन रेकॉर्ड स्वरुपात पाठवली आहे. यासाठी ऋतिकला त्याच्या टीमकडून त्यासंबंधीचे डिटेल्स देण्यात आले होते. दोन आठवड्यापूर्वीच त्याने आपली ऑडिशन क्लिप संबंधितांना पाठवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The human must rise. The reason is the experience itself #krrish

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

नऊवारी साडीतील प्रसाद ओकचा ''खास'' लूक पाहिलाय ?

सध्या याप्रकरणाची चर्चा प्राथमिक स्तरावर सुरु आहे. जर सर्व काही सुरळीत पार पडले तर या चित्रपटाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आधिक आहे. ऋतिकचे आता क्रिश 4 चे चित्रिकरण सुरु आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऋतिकवर त्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेयरचे आरोप करण्यात आल्याने तो वादाच्या भोव-यात सापडला होता. याचा परिणाम त्याच्या वैवाहिक नात्यावरही झाला. 

' मला तू खूप आवडतोस पण, तुझ्यापेक्षा...'

  
 

 
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik Roshan to play a spy in Hollywood