
Hrithik Roshan: नोव्हेंबरमध्ये वाजणार हृतिकच्या दुसऱ्या लग्नाचा बॅण्ड?
Hrithik Roshan: बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरु आहे. आधी आथिया आणि नंतर कियारा लग्न बंधनात अडकले आहे. त्याचबरोबर अजूनही काही कलाकारांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. अभिनेता हृतिक रोशनही सध्या त्याची गर्लफ्रेंड सबा आझादमुळे खूप चर्चेत आहे.
दोघे अनेकदा पापाराझींसाठी एकत्र पोज देतानाही दिसतात. लव्हबर्ड्सनाही चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. हृतिक आणि सबा हे देखील इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडपं आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी त्याचा किसिंग व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आहे.

नुकतचं सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यानंतर असा दावा करण्यात आला आहे की लवकरच हृतिक आणि सबा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. व्हायरल ट्विटवर विश्वास ठेवला तर, दोघेही त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत आहेत. रिफाईड हँडलवरून एक व्हायरल ट्विट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ट्विटनुसार, हृतिक नोव्हेंबर 2023 मध्ये सबासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. हृतिक किंवा सबा या दोघांनीही या ट्विटला उत्तर दिलेले नाही. 'बॉलिवुडलाइफ'च्या अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की हृतिक आणि सबा खूप चांगल्या नात्यात आहेत आणि कुटुंबीयांनीही हृतिकच्या मुलांसोबतचे त्यांचे नाते आनंदाने आणि मनापासून स्वीकारले आहे.
त्यामुळे आता हे दोघं लवकरच त्याच्या नात्याला नवीन नावं देणार असल्याची चर्चा आहे. तरी त्याच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता आहे आणि हे दोघं याची ऑफिशिअल घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे.