सरदारजी हृतिक 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

हृतिक रोशनचा "काबील' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच त्याच्या पुढच्या चित्रपटाची चर्चा सुरू झालीय. हृतिकने अनेक चित्रपटांतून त्याची अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. मग ते अगदी "जोधा अकबर'मधला अकबर असो, किंवा "बॅंग बॅंग'मधला ऍक्‍शन हिरो. त्याच्या "काबील' या चित्रपटात तर त्याने एका अंध तरुणाची भूमिका केलीय. ज्यात तो एक लव्हर बॉय आणि ऍक्‍शन हिरोच्या भूमिकेत आहे; पण हृतिकने आतापर्यंत कधी कॉमेडी चित्रपटात काम केलेलं नाही. त्याच्या आगामी चित्रपटात तो एका सरदाराच्या भूमिकेत आहे, असी चर्चा आहे. हा चित्रपट कॉमेडी असणार आहे.

हृतिक रोशनचा "काबील' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच त्याच्या पुढच्या चित्रपटाची चर्चा सुरू झालीय. हृतिकने अनेक चित्रपटांतून त्याची अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. मग ते अगदी "जोधा अकबर'मधला अकबर असो, किंवा "बॅंग बॅंग'मधला ऍक्‍शन हिरो. त्याच्या "काबील' या चित्रपटात तर त्याने एका अंध तरुणाची भूमिका केलीय. ज्यात तो एक लव्हर बॉय आणि ऍक्‍शन हिरोच्या भूमिकेत आहे; पण हृतिकने आतापर्यंत कधी कॉमेडी चित्रपटात काम केलेलं नाही. त्याच्या आगामी चित्रपटात तो एका सरदाराच्या भूमिकेत आहे, असी चर्चा आहे. हा चित्रपट कॉमेडी असणार आहे. तो पहिल्यांदाच एका कॉमेडी चित्रपटात आणि तेसुद्धा डबल रोलमध्ये दिसणार आहे. डबल रोल अर्थात हृतिकसाठी नवीन नाही; पण कॉमेडी चित्रपट हा त्याच्यासाठी चॅलेंजिंग असेल, यात शंका नाही. 

Web Title: hrithik roshan upcoming movie

टॅग्स