घटस्फोटानंतर हृतिक कोर्टातून बाहेर पडला अन्..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी सांगितला तो प्रसंग
Hrithik Roshan, Sussanne Khan
Hrithik Roshan, Sussanne Khan

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज (१० जानेवारी) ४८वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी, हृतिकचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि आई पिंकी रोशन हेसुद्धा मुलाविषयी व्यक्त झाले आहेत. आईने हृतिकसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तर वडिलांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या स्वभावाविषयी कौतुक केलं. आयुष्यातील कठीण काळालाही तो कशाप्रकारे सामोरं गेला, याविषयी त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिकच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. 'घटस्फोटानंतर हृतिक कोर्टाबाहेर पडला आणि त्याने सुझानसाठी गाडीचा दरवाजा उघडला. यावरून त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव कळतो. अशा गोष्टी कोणी शिकवू शकत नाही. त्या तुमच्यात असाव्या लागतात. फक्त महिलाच नाही तर तो प्रत्येकाचा तितकाच आदर करतो,' असं ते म्हणाले.

Hrithik Roshan, Sussanne Khan
India’s Best Dancer 2 winner: पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब

हृतिकने २००० मध्ये सुझान खानशी लग्न केलं होतं. जवळपास तेरा वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही दोघांनीही मैत्री कायम ठेवली. 'तू खूप चांगला पिता आहेस. रे आणि रिद्ज हे खूप नशिबवान आहेत. तुझ्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत', अशी पोस्ट लिहित हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान हिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या मुलाखतीत त्यांनी हृतिकविषयी काही अशा गोष्टी सांगितल्या, ज्या सर्वसामान्यांना माहित नसतील. 'हृतिकला वाचायला खूप आवडतं. त्याला औषधांविषयी फार माहित असतं. घरात कोणी आजारी असेल तर आधी डॉक्टरकडे जाण्याऐवजी आम्ही त्याचा सल्ला घेतो. हृतिक त्याने केलेल्या मदतींविषयी फारसं कोणाला सांगत नाही. सध्याच्या घडीला त्याने अशा पाच-सहा कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे, ज्यामध्ये त्यांची मुलं गेल्या २० वर्षांपासून मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत', असं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com