esakal | अफगाणिस्तानात अडकला अभिनेत्रीचा मेहुणा; महिनाभरापासून होऊ शकला नाही संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

अफगाणिस्तानात अडकला अभिनेत्रीचा मेहुणा; महिनाभरापासून होऊ शकला नाही संपर्क

अफगाणिस्तानात अडकला अभिनेत्रीचा मेहुणा; महिनाभरापासून होऊ शकला नाही संपर्क

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'शक्तीमान', 'घर की लक्ष्मी बेटियाँ', 'स्वरागिनी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री नुपूर अलंकारचा Nupur Alankar मेहुणा अफगाणिस्तानमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या महिनाभरापासून मेहुण्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं नुपूरने सांगितलं आहे. कौशल अग्रवाल असं त्यांचं नाव असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचं कुटुंबीयांशी बोलणं झालेलं नाही. यामुळे नुपूर आणि तिचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत.

'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुपूर म्हणाली, "माझी बहीण जिज्ञासाची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तिचे पती कौशल अग्रवाल यांनी ऑगस्ट महिन्यापासून आम्हाला संपर्क केलेला नाही. १९ ऑगस्ट रोजी आमचं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. परंतु त्यानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होऊ शकला नाही. आम्ही सर्वजण फार चिंतेत आहोत. अफगाणिस्तानातून भारतात आणलेल्या लोकांची यादी आम्ही दररोज तपासत आहोत. मात्र त्या यादीतही आम्हाला कुठे कौशल यांचं नाव दिसलं नाही. आम्ही सतत परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहोत."

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

नुपूरच्या कुटुंबीयांचं जेव्हा कौशल यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं, तेव्हा फोनमध्ये चार्जिंग नसल्याने मधेच कॉल कट झाला होता. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं नव्हतं. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर नुपूरच्या कुटुंबीयांना कौशल यांच्याविषयी काळजी वाटत आहे. अनेकजण अफगाणिस्तान सोडण्यासाठी जिवाची कसरत करत आहेत. तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

loading image
go to top