Hrithik-Saba: 'आम्हाला वाटलं ती तुझी मुलगीच आहे!' ह्रतिक - सबा ट्रोल |Hrithik Saba Azad trolled spotted Mumbai airport | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Saba Azad news

Hrithik-Saba: 'आम्हाला वाटलं ती तुझी मुलगीच आहे!' ह्रतिक - सबा ट्रोल

Hrithik Saba Azad : ह्रतिकच्या घटस्फोटानंतर काही महिन्यांनीच त्याची पुन्हा गुड न्युज समोर आली. चाहत्यांना मोठा आनंद झाला. ह्रतिक बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलीवूडचा क्रिश अशी त्याची (bollywood Actor Hrithik Roshan) ओळख आहे. तो सध्या त्याच्या विक्रम नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय नवी गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव त्याच्याशी जोडलं गेल्यानं तो भलताच चर्चेत आला आहे. सबाला (Saba Azad) रोशन कुटूंबियांनी देखील पसंती दर्शवली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या पार्टीमध्ये ह्रतिक हा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत आला होता.

आता ह्रतिकच्या चाहत्यांना सबा आझाद कोण आहे नव्यानं सांगण्याची गरज (bollywood trending news) नाही. तिनं एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. रॉकेट बॉईज, नावाच्या मालिकेत तिनं होमी भाभा यांच्या मैत्रीणीची भूमिका केली होती. लव्ह शॉट्समध्ये देखील ती दिसली होती. सबानं प्रायोगिक रंगभूमीवर देखील काम केले आहे. यासगळ्यात तिचं ह्रतिकला भेटणं, त्यांच्यात डेटिंग सुरु होणं यामुळे वेगळ्या चर्चेला उधाण आले होते. सबा आणि ह्रतिक वेगळ्या कारणासाठी ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे.

मुंबई विमानतळावर ह्रतिक आणि सबाला पाहून पापाराझ्झींनी क्लिकक्लिकाट केला. ह्रतिक - सबा एकमेकांच्या हातात घालून चालले असताना त्या फोटोंवरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही कपल्सचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. बॉलीवूडचे नवे लव बर्डस वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. यापूर्वी देखील त्यांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आले होते. तेव्हापासून सबा ही नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होणारी सेलिब्रेटी झाली आहे. खासकरुन तिचं नाव ह्रतिकशी जोडलं गेलं तेव्हापासून तर आणखीनच चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Video: अरुंधती आणि संजनाच्या जुळल्या रेशीमगाठी

ह्रतिकनं देखील विमानतळावर कुणाचीही भीड न ठेवता सबाचा हात हातात घेऊन फोटोग्राफर्सला पोझ दिली. त्याचा तो बिनधास्त अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. काहींना तो खटकलाही आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, मला वाटलं की तुझी मुलगी आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, त्यानं तिचा हात एखाद्या लहान मुलासारखा पकडला आहे. ह्रतिक हा आता 48 वर्षांचा आहे. तर सबा त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयातील अंतर हे आता त्यांना डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

हेही वाचा: Video Viral: विजय देवकोंडानं सगळ्यासमोर अनन्याला केलं किस, रणवीरला आला राग!

Web Title: Hrithik Saba Azad Trolled Spotted Mumbai Airport Viral Video Hand In Hand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..