
Hrithik Roshan tweet for Laal Singh Chaddha: बॅालिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनला(Hrithik Roshan) देखील आता ट्रोलिंगला(Trolling) सामोरं जावं लागतय. खरं तर ह्रितिकने आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' पाहिल्यानंतर लगेच सोशल मिडियावर सिनेमाचे कौतुक करत पोस्ट लिहीली. याच ट्विटमुळे आता नेटिझन्सच्या रोषाला हृतिकला सामोरं जावं लागत आहे. एकीकडे सोशल मीडियावर boycott Laal singh Chadha हे होताना दिसत आहे, त्यातचं आता हृतिकने लिहिलेल्या ट्वीटमुळे त्याला आता नव्या वादाला सामोरं जावं लागतय का हे पाहावं लागेल.(Hritik Roshan getting trolled for praising movie Lal singh Chada)
हृतिक रोशनला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील पीवीआर सिनेमागृहाच्या बाहेर पाहिलं गेलं. थिएटरच्या बाहेर पडतानाचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. हृतिक सोबत सोनाली बेंद्रेचा नवरा दिग्दर्शक गोल्डी बेहेल देखील होता. तोपर्यंत कळू शकलं नव्हतं की हृतिक नेमका कोणता सिनेमा पाहण्यासाठी आला आहे. कारण सिनेमागृहात अक्षयचा रक्षाबंधन आणि आमिरचा लाल सिंग चड्ढा असे दोन्ही सिनेमे रिलीज झाले आहेत. दोन्ही सिनेमांना बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला आहे. आता यादरम्यान हृतिकने ट्वीट करत स्वतःच आपण लाल सिंग चड्ढा पाहिल्याचं सांगितलं आहे. तो पुढे म्हणाला आहे,''त्याला सिनेमा खूपच कमाल वाटला. लोकांनी देखील हा सिनेमा पहायला हवा, असं आवाहन त्याने केलं आहे''.
हृतिक रोशनने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''लाल सिंग चड्ढा मी पाहिला. मी मनापासून हा सिनेमा अनुभवला आहे. सिनेमातील प्लस-मायनस एकीकडे, हा सिनेमा फक्त कमाल आहे. आणि अशा सिनेमाला पाहायची संधी सोडू नका मित्रांनो. जा आणि आता पहा. खूपच सुंदर सिनेमा,फक्त सुंदर''.
हृतिक रोशनच्या या ट्वीटवर फक्त १ तासात २५ हजाराहून अधिक लोकांनी लाइक्सचा वर्षाव केला. तर अनेकांनी ट्वीटला रीट्वीट केलं, पण जशी हृतिकच्या या ट्वीटवर लाइक्सची संख्या वेगानं वाढतेय तसंच अनेकांनी हृतिकला त्याच्या लाल सिंग चड्ढाच्या ट्वीटवरनं ट्रोलही केलं गेलं आहे.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, 'सर,उगाचच लाल सिंग चड्ढाविषयी चुकीची समजुत पसरवू नका. लगेच हे ट्वीट डीलीट करा नाहीतर लोक तुमच्या विक्रमवेधाला बॉयकॉट करा म्हणतील''. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलंय, ''हृतिक तुझी सिनेमाविषयीची आवड इतक्या खालच्या दर्जाची असेल असं मला वाटलं नव्हतं. हा सिनेमा पाहण्यापेक्षा ओरिजनल दर्जेदार कलाकृती फॉरेस्ट गम्प पहा. लाल सिंगने वाट लावलीय मूळ सिनेमाची'. तर एकानं चक्क हृतिकला म्हटलंय, 'तुझा बॉलीवूडमधनं सन्यास घ्यायचा विचार आहे का'.
आता एकीकडे लाल सिंग चड्ढाची प्रशंसा करणाऱ्या हृतिकच्या ट्वीटवर लोक लाइक्सचा वर्षाव करताना दिसत होते,तिकडे आता लाल सिंग चड्ढाची प्रशंसा केल्यानं हृतिकला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही झपाट्यानं वाढताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.