'सलमान रुश्दी यांच्यावरचा हल्ला म्हणजे...'; कंगनाची संतापजनक पोस्ट चर्चेत Kangana ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork

'सलमान रुश्दी यांच्यावरचा हल्ला म्हणजे...'; कंगनाची संतापजनक पोस्ट चर्चेत

Kangana Ranaut reation on salman rushdie attack: भारतीय वंशाचे वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाला. ते एका साहित्यविषयक कार्यक्रमात गेले होते,तेव्हा स्टेजवर येऊन हल्लेखोरानं त्यांच्या मानेवर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर पेंसिलवेनिया च्या एका रुग्णालयात सलमान रुश्दी (salman rushdie) यांना दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर सर्जरी झाली. सलमान रुश्दींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगान रनौतने(Kangana Ranaut) या जीवघेण्या हल्ल्यावर(attack) संताप व्यक्त केला आहे. तिनं सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.(Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork)

Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork

Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork

कंगनानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक लेख शेअर करत लिहिलं आहे, ''या जिहादींनी(कट्टरपंथियांनी) आणखी एक भयानक कृत्य घडवून आणलं. 'द सटॅनिक वर्सेज' आपल्या काळातील दर्जेदार पुस्तकांपैकी एक आहे, माझ्याकडे शब्द नाहीत,मी स्तब्ध झाले आहे''.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: यूपी मध्ये घराघरात जाऊन आमिरच्या विरोधात प्रचार,नवा वाद

अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं देखील सलमान रुश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध जाहीर केला आहे. तिनं ट्वीट करत लिहिलं आहे- ''सलमान रुश्दी यांच्यासाठी मी प्रार्थना करते. हे खूपच लाजिरवाणं आणि भ्याडपणाचं कृत्य आहे''.

हेही वाचा: Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'

कंगना आणि स्वरा व्यतिरिक्त गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी लिहिलं आहेज- ''काही कट्टरपंथीयांनी सलमान रुश्दी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मला खात्री आहे की न्यूयॉर्क पोलिस हल्लेखोरांच्या विरोधात कडक कारवाई करतील''.

सलमान रुश्दी यांना पहिल्यांदा जीवे मारण्याची धमकी त्यांचे वादग्रस्त पुस्तक 'द सनॅटिक वर्सेज' या पुस्तकामुळे ८० च्या दशकात मिळाली होती. ईराणमधून ही धमकी त्यांना देण्यात आली होती. १९८८ मध्ये ते पुस्तक ईराणमध्ये बॅन करण्यात आलं होतं. ईराणचे दिवंगत नेता अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यांनी रुश्दी यांना जीवे मारण्याचा धार्मिक आदेश त्यावेळी जारी केला होता.

कंगनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती सध्या 'इमरजन्सी' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. सध्या ती आजारी असली तरी आपल्या कामावर मात्र तिचं लक्ष केंद्रीत आहे हे तिच्या व्यस्त शेड्युलमुळं समोर आलं आहे.

Web Title: Kangana Ranaut Reation On Salman Rushdie Attack In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..