हृतिक बोलला; मी तिला कधीही खासगीत भेटलेलो नाही!!

गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना रनौट आणि हृतिक रोशन यांचा वाद सतत धगधगतो आहे. कंगनाने हृतिकला केलेले मेल असोत आणि त्याला त्याने दिलेला नकार असो.. पण या दोघांच्या नात्याबद्दल एक नवं कुतूहल निर्माण झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सातत्याने यावर बोलते आहे. पण हृतिक मात्र काहीच बोलला नव्हता. आज हृतिकने आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली भूमिका मांडताना, यात तो म्हणतो, मी आणि तिने नक्की एकत्र काम केलं आहे. पण मी तिला यापूर्वी कधीच खासगीत भेटलेलो नव्हतो. हृतिकने कंगनाविरोधात कायदेशीर तक्रारही दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. 

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना रनौट आणि हृतिक रोशन यांचा वाद सतत धगधगतो आहे. कंगनाने हृतिकला केलेले मेल असोत आणि त्याला त्याने दिलेला नकार असो.. पण या दोघांच्या नात्याबद्दल एक नवं कुतूहल निर्माण झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सातत्याने यावर बोलते आहे. पण हृतिक मात्र काहीच बोलला नव्हता. आज हृतिकने आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली भूमिका मांडताना, यात तो म्हणतो, मी आणि तिने नक्की एकत्र काम केलं आहे. पण मी तिला यापूर्वी कधीच खासगीत भेटलेलो नव्हतो. हृतिकने कंगनाविरोधात कायदेशीर तक्रारही दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. 

आपले हे पत्र लिहिण्यासाठी त्याने फेसबुकचा आधार घेतला आहे. तो म्हणतो, मी नेहमी माझ्या मार्गाने चालत आलो. अनेकदा माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी दुर्लक्ष केलं. पण शांत बसणं आणि दुर्लक्ष करणं याचा अर्थ मला या सगळ्या घटना मान्य आहेत, असा अर्थ घेतला जाऊ लागला आहे. म्हणूनच मी आज माझी बाजू मांडतो आहे, असं म्हणून त्याने आपली बाजू मांडली आहे. तो म्हणतो, या बाईला मी कधीही भेटलेलो नाही. कामानिमित्त जी काही भेट झाली तेवढीच. मी आजवर तिला कधीही खासगीत भेटलेलो नाही. हेच सत्य आहे. कृपया समजून घ्या. माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल मी इथे भांडत नाहीय. किंवा मी कसा चांगला आहे हे भासवण्याचा प्रयत्न मी करत नाहीय. मला माझ्या चुका माहीत आहेत. कारण मीही माणूस आहे. 

काहीतरी खूप गंभीर घडते आहे. जे सत्यापासून खूप लांब आहे. त्याबाबत मी बोलतो आहे. खूपच कमी प्रसारमाध्यमांना या प्रकाराचं गांभीर्य कळते आहे. सात वर्षांपूर्वी दोन हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये एक अफेअर होतं असा दावा केला जातो आहे. पण, दोघेही सेलिब्रेटी असतात. पण त्याचं काहीच प्रूफ नसतं. असं होईल का? म्हणजे या रिलेशनशिपचा एकही पुरावा नाही. पापाराझी फोटो नाहीत, साक्षीदार नाहीत, सेल्फी नाहीत. जानेवारी 2014 मध्ये आमचा साखरपुडा झाल्याचंही म्हटलं आहे. पण त्याचाही काही पुरावा नाही. तरीही आपण या मुलीवर विश्वास ठेवायचा कारण एक मुलगी का बरं खोटं बोलेल? माझे पासपोर्ट डिटेल पाहा. जानेवारी 2014 मध्ये ज्या दिवशी पॅरीसमध्ये साखरपुडा झाल्याचे दाखले दिले जात आहेत, त्यादिवशी मी भारतात होतो.  

या सो काॅल्ड नात्याबद्दल एकच पुरावा दिला गेला आहे, तो म्हणजे फोटोशाॅप करण्यात आलेला आमचा एक फोटो. दुसऱ्याच दिवशी यातला फोलपणा माझ्या मित्रांनी आणि माझ्या माजी पत्नीने उघड केला. हे प्रश्न विचारलेच गेले नाहीत. कारण आपल्याला महिलांचा आदर करण्याचं शिकवलं गेलं आहे. आदर केलाच पाहिजे. मीही तसाच विचार करतो. माझ्या पालकांनीही मला तसंच शिकवलं आहे. माझ्या मुलांनाही मी हीच शिकवण देणार आहे.

जवळपास 3 हजार ई मेल्सचा दाखला दिला जातोय. जे मी कधीच पाठवले नव्हते. सायबर क्राईम याबाबत तपास करते आहेच. लवकरच त्याचा निकाल लागेल. मी माझ्याकडे असलेले सर्व गॅझेट त्याच्याकडे सुपूर्द केले आहेत. लॅपटाॅप, मोबाईल सर्वकाही. पण ती मंडळी हे मान्यच करत नाहीत. गेली चार वर्षं मला या प्रकाराचा भयंकर मानसिक त्रास होतो आहे. या महिलेमुळे मी आता हतबल झालो आहे. म्हणूनच मला माझी बाजू आता मांडावी लागेल. मी चिडलो नाहीय. रागाला माझ्या आयुष्यात थारा नाही. मी कधीच हाणामारी केलेली नाही. माझा घटस्फोट झाला तोही शांततेत. माझ्या आजुबाजूच्या सर्वांनाच शांतता हवी आहे. 

 

 

Web Title: hritik roshan speakes about kangana esakal news