
दगडु-प्राजक्ताचा 'टाइमपास 3' लवकरच; हृता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात
रवी जाधव(Ravi Jadhav) दिग्दर्शित 'टाइमपास'(Timepass) सिनेमाच्या पहिल्याच भागात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या जोडीनं 'मला वेड लागले प्रेमाचे' असं सर्वांनाच म्हणायला भाग पाडलं होतं. नवीन चेहेरे असूनही सिनेमानं मात्र बॉक्सऑफिसवर लांब पर्यंत मजल मारली होती. या सिनेमातील संवाद,गाणी यांनी त्यावेळी लोकांना अगदी मंत्रमुग्ध केलं होतं. अगदी गल्लीच्या नाक्यापासून ते कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत सगळीकडेच टाइमपास फिव्हर पहायला मिळाला होता. प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधवच्या 'टाइमपास २' ने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.
हेही वाचा: करण जोहरवर भडकला पाकिस्तानी गायक; कायदेशीर कारवाईची दिली धमकी
आता 'टाइमपास ३'(Timepass3) भेटीस येतोय अशी बातमी पसरली आहे. आणि त्यात हृता दुर्गुळे(Huta Durgule) प्राजक्ता साकारताना दिसणार आहे. 'मन उडू उडू..' मालिकेत दिसणारी साधीभोळी दीपू म्हणजे हृता 'टाइमपास ३' मध्ये दबंग अंदाजात दिसणार असल्याची बातमी कानावर पडते आहे. याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी बातमी ऐकून हृताचे चाहते मात्र सुखावले आहेत.
हेही वाचा: पोलिसांसाठी केंद्राचा मोठा निर्णय; सलमाननेही 'चुलबुल पांडे' बनत मानले आभार
'टाइमपास'च्या दुसऱ्या भागात दगडू आणि प्राजक्ता मोठे झालेले दाखवले होते. आणि पहिला भाग जिथे संपला तिथून पुढे कथानकानं वेग पकडला होता. दुसऱ्या भागाचा शेवट दगडू -प्राजक्ताच्या मिलनानं झाला पण आता तिसऱ्या भागात प्राजक्ता बदलली म्हणजे 'टाइमपास ३' हा एका टोटल वेगळ्या कथानकाचा भाग असेल असे संकेत मांडले जात आहेत. त्यात नेहमीच आपल्या भूमिकांमधून सॉफ्ट,भावूक भूमिका करताना दिसलेली हृता एकदम दबंग अंदाजात दिसणार असं बोललं जात असल्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढली आहे.
Web Title: Hruta Durgule In Timepass 3 Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..