
पोलिसांसाठी केंद्राचा मोठा निर्णय; सलमाननेही 'चुलबुल पांडे' बनत मानले आभार
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे,ज्यामुळे सलमान खान भलताच खुश आहे. केंद् सरकारनं एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. ज्या अंतर्गत भारतीय पोलिसांना लोकांशी अधिक मैत्रीपूर्ण हितसंबंध ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल. यावर सलमान खानने ट्वीटच्या(Tweet) माध्यमातून आपली भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
देशात पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग कमीशनचे एक सदस्य प्रवीण परदेशी यांनी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ,लोकांच्या समस्या खूप जलद गतीनं सोडवण्यासाठी काय करायला हवं याविषयी सांगितलं होतं. या पोस्टला ट्वीट करताना सलमनानं लिहिलं होतं की,''भारत सरकारने संपूर्ण भारतातील पोलिसांचे लोकांशी अधिक मैत्रीपूर्ण संबंध बनावेत यासाठी एका नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. आता चुलबुल पांडेची इच्छा पूर्ण झाली आहे''.
हेही वाचा: पंचायत 2: 'मंजू देवी-प्रधानजी' 40 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला अन्...
सलमान खाननं आपल्या सुपरहिट दबंग फ्रॅँचायजीत एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा एक असा पोलिस अधिकारी दाखवला आहे जो लोकांसोबत झालेल्या अन्यायाविरोधात नेहमी लढतो. सलमानच्या या चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. दबंग सीरिजचे आतापर्यंत ३ भाग येऊन गेले आहेत. आणि या तिन्ही भागांना लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.
हेही वाचा: Cannes वरुन परत येताच अभिषेकला मिळाली वाईट बातमी,सोशल मीडियावर झाला व्यक्त
सलमान खानच्या आगामी सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो आपल्याला 'टायगर २' मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. त्या व्यतिरिक्त सलमानने 'कभी ईद,कभी दिवाली' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. यानंतर सलमान आपला सुपरहिट सिनेमा 'किक २' च्या सीक्वेलचं शूटिंग जॅकलिन फर्नांडिससोबत सुरू करणार आहे.
Web Title: Salman Khan Tweets About Goi Initiative To Train Police To Be People Friendly Ab Chulbul Pandey Ki Aasha Sach
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..