करण जोहरवर भडकला पाकिस्तानी गायक; कायदेशीर कारवाईची दिली धमकी Karan Johar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistani singer Abrar Ul Haq accuses Karan Johar’s production Jugjugg Jeeyo of illegally using his song

करण जोहरवर भडकला पाकिस्तानी गायक; कायदेशीर कारवाईची दिली धमकी

'जुग जुग जियो'(Jugjugg jeyo) सिनेमाचा ट्रेलर रीलिज सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. पण आता त्यानंतर लगेचच हा सिनेमा वादानं घेरला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक धमाकेदार गाणं तुम्ही ऐकलं असेलच. 'नाच पंजाबन' या पार्टी सॉंगवर ट्रेलर लॉंच दरम्यान सिनेमातील कलाकार थिरकताना आपण सर्वांनी कदाचित पाहिले असतील. हे ढिंचॅक गाणं रिलीजनंतर सर्वसामान्यांच्या ओठांवरही रेंगाळू लागलं. पण गाण्यामागचं सत्य काही वेगळच आहे. हे गाणं नवीन नाही,तर खूप वर्षापूर्वीचं हे गाणं आहे. या गाण्याला पाकिस्तानी गायक अबरार उल हकनं गायलं होतं.

हेही वाचा: 'तारक मेहता' मधून आता हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'जुग जुग जियो' सिनेमातील 'नाच पंजाबन' गाणं हे पाकिस्तानी गाण्याचं कॉपी केलेलं व्हर्जन आहे. आता या विरोधात गायक अबरार उल हकने आवाजा उठवला आहे. प्रसिद्ध गायक अबरारने सोशल मीडियावर करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनवर परवानगीशिवाय त्याचं गाणं चोरल्यामुळे खूप सुनावलं तर आहेच,आणि थेट आरोपही केलाय. पाकिस्तानी गायक अबरारनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय,''मी माझं गाणं 'नाच पंजाबन'चे हक्क कोणत्याही भारतीय सिनेमाला विकलेले नाहीत. ते अद्यापही माझ्याकडेच आहेत, जर कोणी त्याचा गैरवापर केला तर मला कोर्टात दाद मागता येईल म्हणूनच मी ही शक्कल लढवली होती. करण जोहरसारख्या निर्मात्यानं गाणं कॉपी करायला नको हवं होतं. हे माझं सहावं गाणं आहे ज्याला कॉपी केलं जात आहे. आणि याची मी कदापि कोणाला परवानगी दिलेली नाही''.

हेही वाचा: 'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा

त्यानं आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''नाच पंजाबन या गाण्याचे हक्क कोणालाही विकलेले नाहीत. जर कोणी दावा करत असेल तर त्यानं तसा करारनामा दाखवावा,मी कायदेशीर कारवाई करणार आहे''. अबरारचं हे 'नाच पंजाबन' गाणं २००० साली आलं होतं. गाणं त्यावेळी जोरदार हिट झालं होतं. अबरार हा गायक असण्यासोबतच गीतकार आणि राजकारणातही सक्रिय आहे. त्याला 'किंग ऑफ पाकिस्तानी पॉप' या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.

हेही वाचा: रानबाजार:'30 सेकंदाचा 'तो' किसिंग सीन दिला कारण...';तेजस्विनीचा मोठा खुलासा

अबरार उल हकने आपल्या ट्वीटला करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत अकाऊंटला टॅग केलं आहे. पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर हा आरोप करताच लोकांनी थेट बॉलीवूडवर निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,'बॉलीवूडच्या संगीतकारांना ओरिजनल संगीत बनवणं जमत नाहीय बहुतेक?' लोकांनी बॉलीवूडच्या क्रिएटिव्हिटीवरच शंका निर्माण केली आहे. अनेकांनी करण जोहरला याबाबतीत सुनावत अबरारला गाण्याचं क्रेडिट द्याला हवं अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा: 'नग्न' अवस्थेतील युक्रेनियन महिलेच्या आक्रोशानं हादरली 'कान्स नगरी'

या पूर्ण वादावर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. जर आपण देखील करण जोहरच्या 'जुग जुग जियो' सिनेमातील नाच पंजाबन आणि अबरारचं आयकॉनिक गाणं ऐकाल तर खूप समानता आढळून येईल. गाण्याचा ताल आणि सूर सगळंच सेम टू सेम. 'जुग जुग जियो' सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहतानं केलं आहे. २४ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात वरुण धवन,कियारा अडवाणी,अनिल कपूर,नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Pakistani Singer Abrar Ul Haq Accuses Karan Johars Production Jugjugg Jeeyo Of Illegally Using His

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top