Huma Qureshi: तू प्रेग्नंट आहेस का?, हुमा कुरेशी बनली बॉडी शेमिंगची शिकार तो फोटो पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

नुकतेच असे काही घडले आहे, ज्यामुळे हुमा कुरेशी पुन्हा एकदा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.
huma qureshi
huma qureshiSakal

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर हुमा कुरेशीचे नाव त्यात नक्कीच येते. हुमा कुरेशी तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. पण अनेकदा हुमा कुरेशीला तिच्या लठ्ठपणामुळे बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागते.

नुकतेच असेच काही घडले आहे, ज्यामुळे हुमा कुरेशी पुन्हा एकदा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे आणि नेटिझन्स तिला तिच्या वाढत्या वजनामुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.

इन्स्टंट बॉलीवूडने रविवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हुमा कुरेशीचा एक नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. हुमा कुरेशीचा हा व्हिडिओ एका अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेट दरम्यानचा आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की हुमा कुरेशी किती लठ्ठ दिसत आहे.

थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये हुमाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर गोंधळून जाल. हुमा कुरेशीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात असून लोक तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.

huma qureshi
The Kashmir Files मधल्या भूमिकेसाठी पुरस्कार स्वीकारताना Chinmay Mandlekar च्या 'त्या' कृतीने सर्वांचं मन जिंकलं

हुमा कुरेशीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका इंस्टाग्राम यूजरने प्रश्न विचारला आहे - अभिनेत्री प्रेग्नंट आहे का? यानंतर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, पोट किती बाहेर आहे, ड्रेस किती विचित्र दिसत आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे - ती प्रेग्नंट दिसत आहे.

अशाप्रकारे अनेक युजर्सनी हुमा कुरेशीला प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले आहेत. लठ्ठपणामुळे हुमा कुरेशी नेटिझन्सच्या निशाण्यावर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही हुमा या कारणावरून अनेकदा ट्रोल झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com