
भारतात पहिल्यांदाच 'शेफ' वर आधारित बायोपिक; हुमा कुरेशी साकारणार तरला दलाल
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma Qureshi) आता तिच्या चाहत्यांना एका नवीन अवतारात दिसणार आहे. तिनं आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. हुमा कुरेशीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरला(Tarla). तिचा हा सिनेमा प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हुमानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाविषयी घोषणा केली आहे.
हेही वाचा: 'चूक झालीय,पण व्हायरल करू नका'; अश्लील MMS लीक झाल्यावर गायिकेची याचना
हुमा कुरेशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमीच आपले खास फोटोशूट किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती नेहमीच आपल्या सिनेमांविषयी आणि वेबसीरिज विषयी सोशल मीडियावर घोषणा करतानाही दिसते. तिनं नुकतंच आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवर तरला सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये सिनेमातील लूकला देखील तिनं पोस्टरच्या माध्यमातून समोर आणलं आहे.
पोस्टरमधील फोटोत हुमा कुरेशी एका गृहिणीच्या अवतारात दिसत आहे. ती छान चापून-चोपून साडी नेसलेली दिसत आहे. हातात चपाती लाटायचं लाटणं तिनं पकडलं आहे. आणि पोस्टरमध्ये तिच्या बॅकग्राऊंडला खूप सारे भारतीय पद्धतीचे मसाले दिसत आहेत. पोस्टरमध्ये तिचा अंदाज एकदम हटके दिसत आहे. या पोस्टरला शेअर करताना हुमा कुरेशीनं एक खास कॅप्शनही त्याला दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ''तरलाच्या तडक्यानं मनात एकच प्रश्न निर्माण होतो,की कधी मिळेल संधी त्यांच्या अनुभवातनं आलेली स्वादिष्ट चव चाखण्याची,भेटा तरला दलालला आणि जाणून घ्या त्यांची मसालेदार कहाणी''.
हेही वाचा: Lock Upp: जिशान खाननं आझमा फलाहला झाडूनं मारलं; कंगनानं घेतला मोठा निर्णय
सोशल मीडियावार हुमा कुरेशीचा 'तरला' सिनेमाचा पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या सिनेमाच्या या पोस्टरला खूप पसंत केलं आहे. आणि आपल्या प्रतिक्रियाही छान-छान नोंदवल्या आहेत. हुमा कुरेशीच्या इतर सिनेमांविषयी बोलायचं झालं तर नुकतंच तिनं पारितोषिक विजेता सिनेमा 'महारानी'च्या दुसऱ्या सिझनचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सीरीजचा पहिला सिझन खूपच चर्चेत राहिला होता.
Web Title: Huma Qureshi Transforms Into Chef See First
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..