बाहुबलीसारखा नवरा हवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

प्रभासची अमरेंद्र बाहुबली ही व्यक्तिरेखा महिलावर्गाच्या अधिक पसंतीस उतरलीय. कित्येक जणी प्रभासला बाहुबलीच्या रूपात मोठ्या पडद्यावर पाहताना त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. अगदी लोकलच्या गर्दीतही कित्ती भारी दिसतो ना प्रभास... असं एखादीचं वाक्‍य हमखास कानावर पडतं. विवाहेच्छुक मुलींना तर बाहुबलीसारखाच नवरा आपल्या खऱ्या आयुष्यात हवाय. अमरेंद्र बाहुबलीच्या व्यक्तिरेखेतील प्रत्येक बारकावे महिलावर्गाने हेरले आहेत आणि त्यांना ते विशेष भावलेले आहेत. म्हणूनच त्या असं म्हणतायत की, नवरा असावा तर बाहुबलीसारखा! 

अमरेंद्र बाहुबली हा आपली पत्नी देवसेना आणि आपल्या प्रजेशी निष्ठावंत आहे. तो विश्‍वासू आहे. दिलेलं वचन पाळतो. तो खूप समजूतदार आहे. एखादी कृती करण्यापूर्वी समोरच्याचं नीट ऐकून घेतो. माहिष्मतीच्या भर दरबारात तो न्यायाच्या बाजूने उभा ठाकतो. आपले वचन पाळण्यासाठी प्रसंगी आपल्या आईच्या विरोधात जातो. इतकंच नव्हे; तर अमरेंद्र बाहुबली देवसेनेचा आदर करतो. तिच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचेल असं काही करत नाही. तो त्याच्या कुटुंबाला अतिशय जपतो. तसेच तो देवसेनेच्या कुटुंबाचाही आदर करतो. या सगळ्या गुणांमुळे महिलावर्गाला अमरेंद्र बाहुबली म्हणजेच प्रभास प्रचंड आवडू लागलाय. त्यामुळे विवाहेच्छुक मुलांनी आता थोडं सावध व्हायला हवं. नाही का? ...कारण तुमच्यातही तुमची होणारी पत्नी बाहुबलीचे गुण शोधत असली तर... !! 

Web Title: A husband like Bahubali