I am actually the opposite of a heroine.कमल हासननी मला सांगितलं,''अभिनयाच्या कक्षा रुंद कर आणि वेगवेगळ्या भूमिका करण्यावर लक्ष केंद्रित कर.'' Rani Mukerji,Kamal Haasan bollywood actors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamal Haasan

"कमल हासन नसते तर कदाचित माझं करिअर संपलं असतं"

sakal_logo
By
प्रणाली मोरे

असं म्हणतात बॉलीवूडमध्ये यायचं तर गॉडफादर असलाच पाहिजे. किंवा हिरो-हिरोईन म्हणून काम हवं असेल तर दिसायला सुंदर,गोरा रंग,भरपूर उंची अशी मूल्यमापनाची गणितं आखली गेलेली,ज्यात इच्छुकानं फीट बसलं पाहिजे. किंवा मग फॅमिली सिनेइंडस्ट्रीतली असली की बेस्ट. ही परिस्थिती आताची नाही तर गेल्या अनेक वर्षांपासनं बॉलीवूडमध्ये हे असंच चालत आलं आहे. काही महिन्यांपूर्वी तर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमने आपलं डोकं वर काढलं अनं अनेक बड्या बॉलीवूडकरांचे धाबे दणाणले. पण हे सगळे मुद्दे जरी असले तरी मायबाप प्रेक्षकांना अभिनयाचा दम कलाकारात दिसला नाही तर मात्र करिअरचं काही खरं नाही. कारण अशी कितीतरी नावं घेता येतील ज्यांंना गॉडफादर असल्याचा,सुंदर दिसण्याचा किंवा फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचा काहीच फायदा झाला नाही कारण तिथे अभिनयाचे तीनतेरा वाजलेले.

हेही वाचा: विकी-कतरिनाच्या लग्नाला 'या' मराठी अभिनेत्याला खास निमंत्रण?

आज जिचं नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं अशा राणी मुखर्जीला बॉलीवूडमधल्या याच पोकळ मूल्य़मापनाचं दडपण आलं होतं. राणी मुखर्जीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली 2 या सिनेमाच्या निमित्ताने या मागची आठवण शेेअर केली. ती म्हणाली,"मी कधीच विचार नाही केला की मी कधी अभिनेत्री बनेन. कारण माझी उंची कमी होती,मी सावळी होते,माझा आवाज अभिनेत्रीला शोभेल असा नव्हता. पण माझ्या आईने मला विश्वास दिला आणि मी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. पण एक-दोन सिनेमे केल्यावर मात्र इतर अभिनेत्रींना पाहून माझा आत्मविश्वास कमी होत गेला. आणि मी इंडस्ट्री सोडायचा विचार केला होता.

Rani Mukerji

Rani Mukerji

पण तेव्हा सुपरस्टार कमल हासननी मला सांगितलं,"तु जो विचार करतेस तो चुकीचा आहे. एका विशिष्ट विचारसरणीत स्वतःला बांधून ठेवू नकोस. त्यातनं बाहेर पड. स्वतःच्या अभिनयाच्या कक्षा रुंद कर आणि वेगवेगळ्या भूमिका करण्यावर लक्ष केंद्रित कर. स्वतःचा वेळ शारिरीक उंचीकडे लक्ष देण्यात वाया घालवू नकोस. अभिनयक्षेत्रातील तुझ्या यशाची उंची तुझ्यासाठी महत्त्वाची आहे,तिकडे अधिक लक्ष देते. आणि मग काय पुढे घडले तो माझ्यासाठी इतिहासच आहे. जे स्वप्न मी पाहिले होते ते अखेर पूर्ण झाले.

loading image
go to top