Amey Vagh said Vicky invited him for!...Vicky Kaushal,Katrina kaif marriageअर्थात हेच कनेक्शन असेल की विकी आणि अमेयचं बॉंडिंग खास झालं असेल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal,katrina kaif

विकी-कतरिनाच्या लग्नाला 'या' मराठी अभिनेत्याला खास निमंत्रण?

sakal_logo
By
प्रणाली मोरे

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरपासून लग्नापर्यंतच्या सगळ्याच बातम्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. दोघांनीही चुप्पी साधली असली तरी त्यांच्या लग्नाविषयीची लोकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलीय. दोघेही बॉलीवूडचे टॉपचे कलाकार असल्या कारणाने अर्थातच बड्या-बड्या मंडळींची त्यांच्या लग्नात हजेरी लागणार यात शंका नाही. पण बॉलीवूडमधून अद्याप जरी कोणीही या दोघांच्या लग्नाचं निमंत्रण मिळाल्याचं कुठेही बोलून दाखवलेलं नाही. पण आता एक अशी बातमी कळलीय की,बॉलीवूडमधनं लग्नाला कोण जाणार हे माहित नसलं तरी मराठीतल्या एका कलाकाराला विकीनं लग्नाचं निमंत्रण दिल्याची चर्चा डोकं वर काढतेय. आता हा कलाकार कोण असावा यावर मोठी चर्चा रंगलीय.

हेही वाचा: स्वरा भास्कर लवकरच होणार आई....

विकी आणि कतरिनाच्या लग्नाचं निमंत्रण ज्याला मिळालंय तो आहे मराठीतला एक उत्तम अभिनेता अमेय वाघ. आता अमेयने मराठीत भरपूर काम केलं असून बॉलीवूडचा त्याचा प्रवासही सुरू झालाय. नुकत्याच त्यानं घेतलेल्या ब्रॅंड कारवरनं तर लक्षातच आलं की त्याची बॉलीवूडमधली गाडी व्यवस्थित सुरू आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा नवा सिनेमा येतोय. ज्याचं नाव आहे, 'गोविंदा मेरा नाम' त्या सिनेमात अमेय विकी सोबत महत्त्वाची भूमिका करतोय. या सिनेमात विकी मराठी माणूस बनलाय. अर्थात हेच कनेक्शन असेल की विकी आणि अमेयचं बॉंडिंग खास झालं असेल,अनं विकीनं थेट अमेयला लग्नाचं निमंत्रणच देऊन टाकलं.. आता अमेय़ उघडपणे कबूल करीत नसला तरी त्यानं विकीला शुभेच्छा देऊन,निमंत्रण आलं तर नक्कीच जाईन असं म्हटलं आहे. अमेयला याआधी विकीने त्याच्या एका सिनेमाच्या प्रिमियरलाही बोलावलं होतं.

Amey Vagh

Amey Vagh

अमेय वाघचं बॉलीवूड करिअर सुरू झालं ते राणी मुखर्जीसोबत. राणीच्या 'अय्या' सिनेमात अमेयने तिच्या लहान भावाची भूमिका केली होती. तर आमिरच्या 'थ्री इडियट' सिनेमातही आपण 'मिलिमीटरच्या' भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती,पण आपलं सिलेक्शन झालं नाही असं त्यानं हसत-हसत एका मुलाखती दरम्यान नमूद केलं. आपण मराठी-हिंदी दोन्हीकडे भरपूर प्रोजेक्टसवर काम करतोय असंही अमेय या मुलाखतीत म्हणाला.

loading image
go to top