'मला माफ करा..'; 'फादर्स डे'निमित्त रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत

वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिली पोस्ट
Rhea Chakraborty
Rhea Chakraborty

जगभरात 'फादर्स डे'निमित्त प्रत्येक जण आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळालं. यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आपल्या वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. रियाने वडिलांसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सोबत भावूक पोस्ट लिहिली आहे.

फोटो शेअर करत 'फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा! तुम्ही माझी प्रेरणा आहात. मला माफ करा ती वेळ खूप कठीण होती, पण तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे,' असं कॅप्शन रियानं त्या फोटोला दिलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ईडीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान रियाला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणी तिला तुरुंगातही काही दिवस राहावे लागले होते.

Rhea Chakraborty
Father's Day: मराठी कलाकारांचा 'बापमाणूस'

गेल्या वर्षभरात रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांमध्ये फार चर्चा झाली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाला संशयित आरोपी ठरवण्यात आलं होतं. रियाच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना प्रचंड मानसिक त्रास झाल्याचेही तिनं यापूर्वी सोशल मीडियावर सांगितले होते. या त्रासामुळे तिने नव्या घरात जाण्याचा विचार केला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिया चक्रवर्तीने तिच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्या इमारतीखाली पापाराजींची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे रियाने मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी देखील केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com