'मला तुझ्यामध्ये मिळाली नवी 'आशा'; हृताने पोस्ट केला फोटो | Hruta Durgule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hruta Durgule
'मला तुझ्यामध्ये मिळाली नवी 'आशा'; हृताने पोस्ट केला फोटो

'मला तुझ्यामध्ये मिळाली नवी 'आशा'; हृताने पोस्ट केला फोटो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडु उडु झालं' फेम हृता दुर्गुळे ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. हृताचे चाहते नेहमीच तिच्या कामाबरोबरच तिच्या खाजगी आयुष्याविषयी देखील खूप उत्सुक असतात. त्यामुळे तिच्या वैय़क्तीक आयुषावर चाहचत्यांची बारीक नजर असते. नुकताच हृताने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे आणि तिने पोस्ट केलेल्या या फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

हृता ही अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि पोस्टमुळे चर्चेत असते. पण यावेळी तिने पोस्ट केलेला हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर तिने तिच्या प्रेमाची कबूलीही दिली आहे. हृता ही टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहला डेट करत असल्याचं समजत आहे. तिने प्रतीकसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं,'मला तुझ्यामध्ये एक नवीन आशा मिळाली, जी मला कधीच माहिती नव्हती.' तिने हा फोटो पोस्ट करताच एकंदर त्या पोस्टवर चाहत्यांपासून अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावर अभिनेत्री प्रिया बापटने कमेंट करत ‘जलवा’ असं म्हटलं, तर रसिका सुनीलनने अभिनंदन असं म्हटलं आहे.

हेही वाचा: अभिनेत्री ईशाचा 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट' अंदाज

हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, त्यानंतरर ती युवा वाहिनीवरील फुलपाखरु या मालिकेतून घराघरात पोहचली. सध्या तिचं उमेश कामतसोबतच दादा एक गुड न्युज आहे हे नाटक चांगलच गाजत आहे, तर प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदगी अशा हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे.

loading image
go to top