...आणि सोनमला रडू कोसळलं 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

अभिनेत्री स्वरा भास्करचा आगामी चित्रपट "अनारकली ऑफ आराह' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश दास यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला रडू कोसळलं.' "अनारकली ऑफ आराह' या चित्रपटाची कथा नाचगाणी करणाऱ्या महिलांभोवती फिरते. अशा महिलांसोबत झालेल्या छेडछाडीकडे समाजाकडून दुर्लक्ष केलं जातं. मात्र यातील काही महिला अशा अत्याचार व अन्यायाविरोधात आवाज उठवितात. यावर हा चित्रपट भाष्य करतो.

अभिनेत्री स्वरा भास्करचा आगामी चित्रपट "अनारकली ऑफ आराह' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश दास यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला रडू कोसळलं.' "अनारकली ऑफ आराह' या चित्रपटाची कथा नाचगाणी करणाऱ्या महिलांभोवती फिरते. अशा महिलांसोबत झालेल्या छेडछाडीकडे समाजाकडून दुर्लक्ष केलं जातं. मात्र यातील काही महिला अशा अत्याचार व अन्यायाविरोधात आवाज उठवितात. यावर हा चित्रपट भाष्य करतो. सोनमने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले आणि तिने विचारलं, की आपल्या देशात असं होतं का?, असं दास यांनी सांगितलं व ते पुढे म्हणाले की, सोनमने अशा प्रकारचे चित्र पाहिलेलं नाही आणि मला वाटतं की, या सत्यापासून या देशातील बरेच लोक अनभिज्ञ आहेत.

Web Title: I saw Anaarkali of Aarah and cried throughout: Sonam Kapoor