'बहिणीसाठी निवडणूक प्रचार करणार नाही'; सोनू सूदने केलं स्पष्ट | Sonu Sood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malvika Sood with Sonu Sood

'बहिणीसाठी निवडणूक प्रचार करणार नाही'; सोनू सूदने केलं स्पष्ट

अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे सोमवारी दुपारी मोगामध्ये आले. यावेळी त्यांनी मालविका यांना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश दिला. मालविका सूद यांना मोगामधून काँग्रेस पक्षाद्वारे उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच बहिणीसाठी निवडणूक प्रचार करणार नसल्याचं सोनूने स्पष्ट केलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद याविषयी व्यक्त झाला.

"तिने धाडस केलं याचा मला अभिमान वाटतो. ती गेल्या काही वर्षांपासून तिथे राहत आहे आणि तिला तिथल्या लोकांच्या समस्या माहित आहेत. ती लोकांच्या संपर्कात राहून त्यांना मदत करू शकेल, याचं मला समाधान आहे", अशी प्रतिक्रिया सोनू सूदने दिली. बहिणीसाठी प्रचार करणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "हा तिचा प्रवास आहे आणि माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी जे काम करत आलो आहे तेच करत राहीन. मी निवडणुकीत तिच्यासाठी प्रचार करणार नाही कारण तिने कठोर परिश्रम करावे, मेहनत करावी अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत माझा संबंध आहे, मी नेहमीच राजकारण किंवा कोणत्याही राजकीय संलग्नतेपासून दूर राहीन."

हेही वाचा: लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण..

सोनू सूदला वर्षभरापूर्वी निवडणूक आयोगाकडून पंजाबचा 'स्टेट आयकॉन' म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात सोनू सूदची पंजाबचा 'स्टेट आयकॉन' म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली होती. कुटुंबातील एक सदस्य आगामी विधानसभा निवडणूक लढवत असल्याने स्वेच्छेने राजीनामा दिल्याचं सोनू सूदने सांगितलं होतं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top