आता आयएस अधिकारीही बोलून गेलाय..शाहरूख,अजय आणि अमिताभला विचारला जाब

अवनीश शरण या आयएस अधिकाऱ्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटला हावडा ब्रीजचा एक फोटो शेअर केलाय.
IAS Officer tweeted on ajay,shahrukh
IAS Officer tweeted on ajay,shahrukh

अभिनेता अक्षय कुमारने घुटका,तंबाखू प्रकणात माफी मागीतली तर अजय देवगणने माझी वयक्तिक नीवड म्हणत या घुटका तंबाखूच्या जाहिरातीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.मात्र या जाहिरातीचा वाद जेवढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तेवढेच आणखी जास्त हे अभिनेते ट्रोल होताना दिसताय.

सोशल मीडियावर सध्या या वादाने एखाद्या वादळाप्रमाणे धूमाकुळ घातलाय.अनेकांच्या ट्वीट मध्ये या अभिनेत्यांना अनेक टोकाच्या गोष्टी सुनावल्यानंतर आता परत पश्चिम बंगालच्या एका आयएस अधिकाऱ्याने यांना जाब विचारला आहे.अवनीश शरण या आयएस अधिकाऱ्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटला हावडा ब्रीजचा एक फोटो शेअर केलाय.ज्यामधे त्याने शाहरूख खान,अजय देवगण आणि अमिताभ बच्चनला जाब विचारलाय.या अधिकाऱ्याच्या ट्वीटमधे त्याने ब्रीजवरचा लोकांनी घुटका तंबाखू खाऊन थुंकून खराब केलेल्या एका पीलरचा फोटो शेअर केलाय.तसेच त्याने लिहीले आहे की,मागल्या ७० वर्षापासून घुटका या ब्रीजला खराब करत आहे.तसेच पश्चिम बंगालमधे आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार तंबाखू किंवा घुटका आणि पान मसालाच्या उत्पादनास संपूर्णपणे बंदी आहे.या ट्वीटमधे त्याने शाहरूख खान,अजय देवगण आणि अमिताभ बच्चनला मेंशन केले आहे.

अजय देवगणने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले की,"मी कुठल्या पदार्थाची जाहिरात करावी तो माझा वयक्तीक प्रश्न आहे.तसेच काही गोष्टी या नुकसानकारक असतात तर काही चांगल्या असतात.मी तर ईलायचीची जाहिरात केलेली आहे.आणि ज्या गोष्टी योग्य नाही त्यांची विक्रीच करायला नको.आम्ही कुठली जाहिरात करायला हवी याचा निर्णय घेण्यास समर्थ आहोत."जाहिरातीच्या या वादावर सध्या राजकारण्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रटीजपर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com