
'मी तर वेलचीची जाहिरात...' अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणची सारवासारव
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सोशल मीडियावर आपल्या एका जाहिरातीवरनं सुरु झालेल्या वादामुळे सध्या चर्चेत आहे. अक्षय पहिल्यांदाच विमल या तंबाखू उत्पादनासंबंधित ब्रॅंडच्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि अजय देवगण(Ajay Devgan) सोबत दिसला. या तिन्ही सुपरस्टार्सना एका फ्रेममध्ये दाखवणारी एक जाहिरात व्हायरल झाली अन् लगोलग ट्रोलही व्हायला सुरुवात झाली. तिन्ही कलाकारांमध्ये सर्वात जास्त वाद हा अक्षयच्या दिसण्यामुळे रंगला.
हेही वाचा: KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी?
तंबाखू ब्रांडशी नाव जोडलं गेल्यानं अक्षय कुमारला जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. वाद पेटतोय हे लक्षात आल्यावर अक्षयनं लगेचच माफी मांगण्याचा मार्ग अवलंबला. पण तरिदेखील अद्याप अक्षयविरोधात रागाचा सूर उमटतानाच दिसत आहे. आता अक्षय कुमारवर होणाऱ्या टिकेवर अजय देवगणनं प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अजय म्हणाला आहे की,''कोणत्या उत्पादनाची जाहिरात करायची तो निर्णय ज्याचा-त्याचा असतो,जो खूपच वैयक्तिक आहे. स्वतःचे निर्णय घेण्याइतपत प्रत्येकजण नक्कीच मॅच्युअर आहे''.
हेही वाचा: मंदाना करिमीनं घेतलं अनुराग कश्यपचं नाव; म्हणाली,'माझ्या गर्भपाताला तो...'
अजय देवगण पुढे म्हणाला,''काही प्रोडक्ट्स असतात जे हानिकारक असतात आणि काही प्रोडक्ट्स हे नुकसान करत नाहीत. मी नाव नं घेता याविषयी बोलेन कारण मला उगाचच कोणाला प्रमोट करायचं नाही. मी वेलची पानमसाल्याची जाहिरात करतो. मला वाटतं जर या गोष्मटी नुकसामन करतात तर मग जाहिरातींपेक्षा आधिक तर त्या उत्पादनांवरच बंदी आणा''.
हेही वाचा: मराठी माणसाला लाजवणारं आमिरच बोलणं ऐकलंय? व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमारनं विमल इलायचीची जाहिरात करुन स्वतःला वादात ढकलून दिलं आहे. अक्षयनं गुरुवारी सोशल मीडियावर आपला माफीनामा शेअर करत आपल्या चाहत्यांची माफी मागितली. तंबाखू ब्रॅंडशी जोडलेलं आपलं नाव मागे घेत आहोत असंही तो म्हणाला. आपल्याला या जाहिरातीचे जेवढे पैसे मिळाले आहेत ते आपण दान करणार आहोत असंही तो म्हणाला. त्यानं आपल्या चाहत्यांना वचनं दिलं की,यापुढे आपण कोणत्याही प्रोजेक्टशी जोडण्याआधी खुप विचार करु.
Web Title: Ajay Devgn Allegedly Reacts To Controversy Of Akshay Kumar Joining Pan Masala Brand Its A Personal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..