World Cup 2023 : आता पुन्हा हल्लाबोल, 'Lets Do It Tibara' अभिमानानं उर येईल भरून!

भारतीय संघाला प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियावर 'डु इट तिबारा' नावाचे गाणे व्हायरल झाले आहे.
ICC world cup 2023 Do It Tibara cricket anthem featuring
ICC world cup 2023 Do It Tibara cricket anthem featuringesakal

Poonawalla Fincorp ICC world cup 2023 Do It Tibara cricket anthem: भारतीय संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये केलेली सुरुवात मोठी आश्वासक आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देशभरामध्ये वर्ल्ड कपचा फिव्हर आहे. सगळीकडे उत्साहाचे अन् उल्हासाचे वातावरण आहे. भारतीय संघानं तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिवाळीची मोठी भेट द्यावी अशी तमाम भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.

भारतीय संघाला आणखी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियावर 'डु इट तिबारा' नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. पूनावाला फिनकॉर्प (Poonawalla Fincorp) ने लाँच केलेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा, क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद दिला आहे. पूनावाला फिनकॉर्प ही बँकेतर वित्तीय कंपनी असून विश्वासार्हता, पारदर्शकता आणि इनोव्हेशन या बळावर कंपनीने यशाचे शिखर गाठले आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू श्रीकांत आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंग हे त्या गाण्यामध्ये वेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्या गाण्याला मिळालेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

ICC world cup 2023 Do It Tibara cricket anthem featuring
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

आतापर्यत वर्ल्ड कपमध्ये भारताचे चार सामने झाले असून ते सगळे सामने भारतानं मोठ्या फरकानं जिंकले आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतानं केलेला पराक्रम खूप काही सांगून जाणारा आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय संघावर चाहते सध्या खूपच खूश आहेत. भारतीय संघानं तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येक सामन्याला भारतीय चाहत्यांची असलेली उपस्थिती संघाचे मनोबल वाढवताना दिसत आहे.

अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Do It Tibara गाण्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. काल भारतानं बांग्लादेशला पराभवाची धूळ चारत आपली विजयमालिका कायम ठेवली आहे. आता येत्या रविवारी भारताचा सामना बलाढ्य न्युझीलंडशी होणार आहे. त्यात नव्यानं आलेल्या या गाण्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदीनं हे गाणं गायलं असून भारतीय संघानं आणखी एका मोठ्या यशाला गवसणी घालावी असे आवाहन समस्त भारतीय चाहत्यांच्या वतीनं भारतीय संघाला करण्यात आले आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचं हे क्रिकेट अँथम असल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे.

ICC world cup 2023 Do It Tibara cricket anthem featuring
Ind vs Ban : कोहलीचे शतक पूर्ण व्हावे, म्हणूनच अंपायरने दिला चुकीचा निर्णय? जाणून घ्या काय आहे ICC चा नियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com