esakal | इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण: अभिनेत्री हिना पांचाळला जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

(Heena Panchal)

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण: अभिनेत्री हिना पांचाळला जामीन मंजूर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळला (Heena Panchal) अखेर जमीन मंजूर करण्यात आला आहे. अटक केलेल्या 25 संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून सोमवारी (19 जुलै) जामीन मंजूर करण्यात आला. मात्र हर्ष शलैश शहा आणि पीयूष सेठी या दोघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. या दोघांकडे अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. (igatpuri rev party case actress heena panchal granted bail)

काय होतं प्रकरण?

इगतपुरीतील 'स्काय व्हिला' या बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत एका इराणी महिलेसह हिना पांचाळ आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर चार सेलिब्रिटींचा समावेश होता. या कारवाईत एकूण 28 जणांना अटक केली होती. इगतपुरीतील बंगल्यात सेलिब्रिटींची रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी अमली पदार्थ ताब्यात घेतले होते.

हेही वाचा: नवरा असावा तर असा, प्रियंकाला निकनं दिलं खास 'बर्थडे गिफ्ट'

हिनाला जेव्हा अटक करण्यात आली होती, त्यावेळी तिच्या आईने प्रतिक्रीया देखील दिली होती, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘मला हे कळताच मोठा धक्का बसला. पण मला माहित आहे, हिना असं करू शकत नाही कारण ती तशी नाही. त्याचे मित्र तसे असतील. या तणावामुळे हिनाच्या वडिलांची तब्येतही खालावली.’ पोलीस स्टेशनमध्ये हिनाला भेट घेत तिची बहिण म्हणाली की, ‘जेव्हा मी हिनाला भेटले, तेव्हा ती खूप भावनिक झाली होती, पण हिना खूपच खंबीर आहे. तिने मला सांगितले की, जेव्हा मी काहीही चूक केली नाही तेव्हा घाबरायची काहीच गरज नाही.’

हेही वाचा: राजपाल यादवला होती जेठालालच्या भूमिकेची ऑफर, पण..

loading image