KKR 13: अरेरे! खतरो के खिलाडी मध्ये स्टंट दरम्यान जखमी झाल्याने हा खेळाडू बाद, गाठली मुंबई... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit roy, kkk 13, khatron ke khiladi, khatron ke khiladi 13

KKR 13: अरेरे! खतरो के खिलाडी मध्ये स्टंट दरम्यान जखमी झाल्याने हा खेळाडू बाद, गाठली मुंबई...

KKR 13 News: खतरो के खिलाडी १३ मधून एक मोठी बातमी समोर आलीय. KKR 13 दरम्यान अभिनेता रोहित रॉय जखमी झालाय.

रोहित शेट्टीने दिलेल्या एका स्टंट दरम्यान रोहित गंभीर स्वरूपात जखमी झाले. यामुळे रोहित यांना साऊथ आफ्रिका केपटाऊन मधून थेट मुंबई गाठावी लागली.

ही बातमी त्यांच्या फॅन्सची नक्कीच धक्कादायक आहे. फॅन्स रोहित यांना पुन्हा या शो मध्ये पाहू इच्छितात. मिळालेल्या माहितीनुसार रोहित पुन्हा एकदा केपटाऊनमध्ये परतणार नाहीत. त्यांची प्रकृती अद्याप ठीक नाही.

(In Khatro Ke Khiladi, this player rohit roy was injured during a stunt )

'ईटाईम्स'च्या रिपोर्टनुसार, रोहित रॉय कामातून बराच ब्रेक घेतल्यानंतर KKR 13 च्या निमित्ताने एका स्टंट शोचा भाग बनला. पण त्याला दुखापत झाली.

या जखमा बऱ्या होत असल्या तरी हळू हळू होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच कदाचित आता ते या शो मध्ये परत जाऊ शकत नाहीत.

तो पूर्णपणे बरा झाल्यावरच विचार करेल. दुसरीकडे, चॅनलने सुद्धा त्याला होल्डवर ठेवले आहे.

25-26 मे रोजी केपटाऊनमध्ये स्टंट करताना रोहित रॉयला दुखापत झाल्याची बातमी आली होती. त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल, असा दावा अहवालात करण्यात आला होता.

तसेच, काही मनोरंजन पोर्टल्सनी तो शो सोडण्याची शक्यताही वर्तवली होती. पण कशाचीही पुष्टी झाली नाही. मात्र आता तो या शोमध्ये येणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

यामुळे चाहत्यांची नक्कीच निराशा होईल. मात्र रोहितला वाइल्डकार्ड एन्ट्री घेता येईल अशीही आनंदाची बाब आहे. पण कधी, हे मात्र त्याच्या प्रकृतीवर आरोग्यावर अवलंबून आहे. दरम्यान खतरो के खिलाडी मध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी आहे

टॅग्स :rohit roy