Independence Day 2022: ए आर रहमानचा जगप्रसिद्ध 'वंदे मातरम' अल्बम कसा घडला माहितीय?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आलेल्या या अल्बमने देशवासियांना अक्षरशः वेड लावलं..
Independence Day 2022 : stroy behind a r rahman's vande mataram album released in 1997
Independence Day 2022 : stroy behind a r rahman's vande mataram album released in 1997sakal

independence day 2022 : आज भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करत आहे. लाखों वीरांच्या बलिदानाने प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्याला आज 75 वर्षे झाली. त्या निमित्ताने देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणजेच 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. भारत देशात अनेक देशभक्तीपर गाणी घडली, त्यापैकीच एक म्हणजे सर्वांच्याच लक्षात राहणारा दिग्गज संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांचा 'वंदे मातरम' अल्बम. हा अल्बम कसा घडला त्यामागेही एक रंजक किस्सा आहे, तोच आज जाणून घेऊया..

(Independence Day 2022 : stroy behind a r rahman's vande mataram album released in 1997)

भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास 50 वर्षे होत आली असतील, तेव्हाचा हा काळ. साधारण 1990 च्या सुमारास देश नव्या अर्थ व्यवस्थेकडे जात होता. त्यावेळी जाहिरातींना जबरदस्त मागणी होती. आणि जाहिरात क्षेत्रात 'भारत बाला' यांचं मोठं नाव झालं होतं. भारत बाला यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. ते मात्र बाला यांच्या कामावर नाराज होते. त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने भारतासाठी काहीतरी करावं. भारत बाला यांनी आपला मित्र ए आर रहमानला 'काहीतरी करूया' असं सांगितलं आणि तिथेच खऱ्या अर्थाने या अल्बमची सुरुवात झाली.

तरुणाईच्या मनात घर करून राहणारी, त्यांच्या ओठात बसणारी गाणी करण्याचा विचार यांनी केला. याच विचारातून गीतकार मेहबूब पुढे आले आणि त्यांच्या लेखणीतून ‘माँ तुझे सलाम’ हे गाणं साकारलं गेलं. भारत बाला यांना या अल्बमला न्याय द्यायचा होता. त्यांना हा प्रोजेक्ट काहीतरी वेगळा करायचा होता त्यामुळे ते आणि त्यांची पत्नी कनिका यांनी सर्व पैसे पणाला लावून संपूर्ण भारतात शूटिंग करायचं ठवरलं.

याच अल्बम मधील एक महत्वाचे गाणे म्हणजे 'gurus of peace'. या गाण्यासाठी रहमान यांनी थेट नुसरत फतेह अली खान यांच्याशी संपर्क साधला आणि एका रात्रीत अल्बममधील gurus of peace नावाचं गाणं तयार झालं. तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या 'वंदे मातरम' या ओळींना गिटार आणि इतर वाद्यांच्या साथीने नवे वळण देण्याचं काम ए आर रहमान यांनी केलं. मजल दरमजल करत अल्बम तयार झाला. पण तो बाजारात आणण्यासाठी एका खंबीर पाठिंब्याची गरज होती आणि तो पाठिंबा सोनी म्युजिक इंडियाने दाखवला.

हा अल्बम 1997 साली म्हणजेच भारत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध करण्यात आला. त्या वर्षी अल्बमने तुफान कमाई केली. अल्बमच्या जवळपास 5 लाख कॅसेट एका आठवड्यात विकल्या गेल्या. आजही हा अल्बम आवडीने ऐकला जातो. या अल्बमचे विशेष म्हणजे यातील गाणी ही तरुणांच्या ओठांवर आली आणि कायमस्वरूपी तशीच राहिली.





ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com