रिषभ पंतने उर्वशी रौतेलाला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केले कारण...

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

रिषभ आणि उर्वशी हे एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त आल्यानंतर यांच्याविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. पण, रिषभने नुकतेच आपली गर्लफ्रेंड ईशी नेगी हिच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर उर्वशीसोबत त्याचे संबंध असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.

मुंबई : क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांचे नाते सर्वांनाच माहिती आहे. आता या दोन्ही क्षेत्रांचा पुन्हा एकदा संबंध असल्याचे दिसत आहे, पण यंदा कारण वेगळे आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'स्पॉटबॉय' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला हि अनेक दिवसांपासून रिषभशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात येत नव्हता. अखेर त्याने तिचे फोन कॉल आणि व्हॉट्सऍपही ब्लॉक केले आहे. यानंतर तिनेही त्याला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केल्याचे तिच्या मॅनेजरने सांगितले आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्याची गर्लफ्रेंड सेक्स रॅकेटमध्ये

रिषभ आणि उर्वशी हे एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त आल्यानंतर यांच्याविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. पण, रिषभने नुकतेच आपली गर्लफ्रेंड ईशी नेगी हिच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर उर्वशीसोबत त्याचे संबंध असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वशीचे यापूर्वी हार्दिक पंड्यासोबतही नाव जोडले गेले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Cricketer Rishabh Pant has blocked Actress Urvashi Rautela On WhatsApp