क्राईमला रोमान्सचा तडका

मुलाखत- रामगोपाल वर्मा दहनम नावाची नवीन वेबसिरिज घेऊन येत आहेत
Indian film director Ram Gopal Varma interview of Dahanam Webseries
Indian film director Ram Gopal Varma interview of Dahanam Webseriessakal
Summary

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे बाॅलीवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक. त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवरील चित्रपट बनविले आहेत. काही वेळेला त्यांनी केलेल्या विधानांवरून ते वादग्रस्तही ठरलेले आहेत. आता रामगोपाल वर्मा दहनम नावाची नवीन वेबसिरिज घेऊन येत आहेत. एमएक्स प्लेअरवर ही सीरीज लवकरच येणार आहे. या सीरीजबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.....

दहनम सिरिजमध्ये प्रेक्षकांना काय विशेष पाहायला मिळणार आहे?

दहनम या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना एक थ्रीलर क्रिमिनल आणि सस्पेन्सने भरलेला ड्रामा पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण क्राईम थ्रीलर चित्रपटात किंवा सिरिजमध्ये फक्त अॅक्शन पाहतो. मात्र ही वेब सिरिज थोडी विशेष असणार आहे. सिरिजमध्ये प्रेक्षकांना थरारक अॅक्शन आणि रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे. क्राईम सिरिजमध्ये रोमान्सचा तडका हे या सिरिजचे वेगळेपण असणार आहे. या सिरिजच्या माध्यमातून काही सत्य परिस्थिती देखील प्रेक्षकांच्या समोर उघड होणार आहे. त्यामुळे ही सिरीज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

दिग्दर्शक अगस्त्य मंजूसोबत तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहात तर त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय सांगाल?

अगस्त्य आणि माझं अतिशय सुंदर नातं आहे. आमच्या दोघांमधली केमिस्ट्री ही एकमेकांसोबत कनेक्ट होते. एखाद्या चित्रपटात किंवा सिरिजमध्ये मला ज्या गोष्टी हव्या असतात त्या सर्व गोष्टी मी अगस्त्यला न सांगताच समजतात. त्यामुळे माझ्या हृदयात त्याच्यासाठी अतिशय विशेष स्थान आहे. त्याच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर तो त्याचं काम चोख पार पाडतो. एक दिग्दर्शक म्हणून तो नेहमी उत्तम आहे. पण व्यक्ती म्हणून देखील तो अतिशय साधा व कोणत्याही गोष्टीचा अभिमान नसलेला असा आहे. त्याचा हा सभ्यपणा व साधेपणा मला नेहमीच आवडतो. त्यामुळे अगस्त्य माझ्या आवडत्या दिग्दर्शकापैकी एक आहे.

तुम्ही बरीच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. सत्या, रंगीला यांसारखे चित्रपट तुम्ही बनवले आहेत. त्यावेळेच्या इंडस्ट्रीमध्ये आणि आताच्या इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलाकडे तुम्ही कसं बघता?

खरं तर बदल होणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं माणूस गरजेनुसार बदलतो तसंच वस्तू देखील बदलतात. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये झालेले बदल हे त्या त्या वेळेनुसार महत्वाचे होते. महत्वाचं म्हणजे बदल ही काळाची गरज आहे. त्यामुळे माणसाने गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करत राहणं महत्वाचं आहे आणि तरच तो या जगामध्ये टिकू शकतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये झालेले जे काही बदल आहेत ते त्या त्या वेळेस गरजेचे होते. आता इंडस्ट्रीमध्ये झालेले बदल हे चांगले बदल झाले आहेत असे म्हणता येईल.

या सीरीजमधील स्टारकास्टला साईन करताना कोणत्या गोष्टीचा निकष समोर ठेवला होता?

मला या सिरिजमधील प्रत्येक पात्र अतिशय वेगळं आणि खास हवं होतं. प्रत्येक पात्राचं स्वतः चं असं एक स्वतंत्र विश्व यामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे बिनधास्त आणि कामाच्या बाबतीत झोकून देणाऱ्या पात्राची गरज मला या सिरिजमध्ये आवश्यक होती. यासोबत आपल्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय देणारे कलाकार यामध्ये हवे होते. नयना गांगुली, ईशा कोप्पीकर, अभिषेक दुहान, अभिलाष चौधरी, सयाजी शिंदे, पल्लवी अरुण यांच्यासारखे हरहुन्नरी कलाकार मला भेटले आणि माझा हा शोध पूर्ण झाला आहे असं म्हणता येईल.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता अनेक नवनवीन शो आणि चित्रपट येत आहेत. त्यामुळे चित्रपटांसाठी-चित्रपटगृहांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची खूप मोठी स्पर्धा आहे असं वाटतं का?

- प्रत्येक प्लॅटफॉर्म त्यांचं काम उत्तमरीत्या करत आहे. ज्या ठिकाणी चांगला कंटेन्ट आहे त्याकडे प्रेक्षक नक्कीच वळतात. चित्रपटांचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे आणि ओटीटीचा प्रेक्षक वर्ग देखील वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. आता प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे आपण सांगू शकत नाही. आपण उत्तमोत्तम चित्रपट व सिरीज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत रहायचं. त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे प्रेक्षक ठरवतील.

आतापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त क्राईम व सस्पेन्स ड्रामाने भरलेले चित्रपट बनवले आहेत. तर फक्त क्राईम जॉनरचे चित्रपट बनवणे हाच अट्टहास का?

खरं तर मला क्राईम ड्रामामध्ये जास्त आवड आहे. या जॉनरमध्ये प्रत्येक कथेनुसार नवनवीन कथा उलगडत जातात. अॅक्शन ड्रामा तसेच सस्पेन्सने भरलेल्या गोष्टी मला नेहमीच आवडतात. यामध्ये अॅक्शन आणि रोमान्स दोन्ही एकाच वेळेला दाखवू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांना देखील क्राईम सिरिज व चित्रपट पाहण्याची जास्त आवड आहे असं मला वाटतं.

- जान्हवी वंजारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com