esakal | Indian Idol 12: का होतेय शन्मुखप्रिया ट्रोल ? तिनंच सांगितलं कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

shanmukhapriya

Indian Idol 12: का होतेय शन्मुखप्रिया ट्रोल ? तिनंच सांगितलं कारण...

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो इंडियन आयडॉलमधील ((indian idol 12) स्पर्धकांमुळे आणि परिक्षकांमुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक शन्मुखप्रियाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. तिला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी अनेकजण करत आहेत. सातत्याने ट्रोल होणाऱ्या शन्मुखप्रियाने शोच्या एका एपिसोडमध्ये तिच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल सांगितले आहे.(indian idol 12 im stressed says shanmukhapriya about getting troll)

गेल्या काही दिवसांपासून शन्मुखप्रियाचे चाहते तिच्या या शोमधील परफॉर्मन्समुळे नाराज आहेत. त्यामुळे शन्मुखप्रियाने सांगितले की, या आठवड्यातील परफॉर्मन्ससाठी तिच्यावर खूप ताण आहे. शोमध्ये ती 'ये मेरा दिल' हे गाणे गाणार आहे. 'माझा परफॉर्मन्स जास्त चांगला झाला पाहिजे, या तणावाखाली मी आहे',असे शन्मुखप्रिया म्हणाली. गेली काही दिवस सोशल मीडियावर शन्मुखप्रियाला तिच्या या शोमधील गाण्यांमुळे ट्रोल केले जात होते. अनेक नेटकऱ्यांनी 'शन्मुखप्रिया जुनी गाणी गाताना त्यांची अक्षरश: वाट लावते', अशा शब्दांत तिच्यावर टीका केली होती. त्यामुळे अनेकांनी तिला शोमधून काढण्याची मागणी शोच्या निर्मात्यांकडे केली होती.शन्मुखप्रियाने गायलेल्या प्रियांका चोप्राच्या 'डार्लिंग' या गाण्यामुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा: 'क्योंकि बहू भी कभी टेनिस फॅन थी' स्मृती इराणी यांचा व्हिडिओ व्हायरल

'मला शोबाहेर काढून टाकण्याची मागणी होतेय. पण मी ट्रोलिंगला फारसं महत्त्व देत नाही. ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत. मायकल जॅक्सनसारख्या महान कलाकारवरही टीका झाली होती. मी तर खूप लहान आहे', काही दिवसांपुर्वी असे उत्तर शन्मुखप्रियाने ट्रोलर्सला दिले होते. गायक अभिजित सावंतने या शोवर टिका केली होती तसेच किशोर कुमार यांना समर्पित केलेल्या एपिसोडवरुन वाद निर्माण झाला होता.

हेही वाचा: न्यू आयलॅंडवर सोनाली आणि कुणालचा 'MINIMOON'; पाहा रोमॅंटिक फोटो

loading image