esakal | Indian Idol 12: परफॉर्मन्सदरम्यान गाणं विसरला पवनदीप; परीक्षक झाले अवाक्!
sakal

बोलून बातमी शोधा

pawandeep rajan

Indian Idol 12: परफॉर्मन्सदरम्यान गाणं विसरला पवनदीप; परीक्षक झाले अवाक्!

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 12' (indian idol 12) नेहमी चर्चेत असतो. कधी या शोच्या परीक्षकांची तर कधी स्पर्धकांची चर्चा सोशल मीडियावर नेहमी सुरू असते. या शोमध्ये पवनदीप राजन (pawandeep rajan) या स्पर्धकाला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. त्याच्या एका परफॉर्मेंसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवनदीप ‘होंठों से छूलो तुम, मेरा गीत अमर कर दो’ हे गाणं म्हणताना अचानक थांबला असे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.(indian idol 12 pawandeep rajan forgot the lyrics of song)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पवनदीप गाणं अर्धवट सोडतो. ते पाहून शोच्या परीक्षकांना आणि स्पर्धकांना धक्का बसतो.धर्मेंद्र आणि अनीता राज यांनी शोच्या या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या दोघांच्या समोर पवनदीपने ‘होंठों से छूलो तुम, मेरा गीत अमर कर दो’ हे गाणं गाणले. हे गाणे चित्रपट ‘प्रेमगीत’ मधील असून अभिनेता राज बब्बर आणि अनीता राज यांच्यावर चित्रीत केले आहे. चित्रपटात हे गाणे जगजीत सिंह यांनी गायले आहे. पवनदीपने या गाण्यामधील ‘जब प्यार करें कोई तो देखें केवल मन’ या ओळीऐवजी 'देखें यह जीवन' असं म्हणाला. त्याला त्याची चुक लक्षात येताच त्याने परफॉर्मेंस थांबवला. पण परीक्षकांनी त्याला पुन्हा गाण्याची संधी दिली.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

असा अंदाज लावला जात आहे की 4 आठवड्यांपुर्वी सवाई भाटसोबत ‘बॉटम टू’ मध्ये असणाऱ्या पवनदीपला त्याची ही चुक महागात पडू शकते.

हेही वाचा: 'येऊ कशी..'मधील मोहितची रिअल लाइफ पार्टनर, पहा खास फोटो

loading image