Indian Idol 12 ; विशाल दादलानीचा मोठा निर्णय

दमणला जाण्यास नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी या परिक्षकांनी नकार दिला होता..
vishal dadlani,indian idol 12
vishal dadlani,indian idol 12file image

मुंबई - प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 12' (indian idol 12) सध्या फार चर्चेत आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारने केलेल्या टीकेमुळे या शोबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तसेच प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने (sunidhi chauhan) देखील या शोबद्दल खुलासा केला होता. 'इंडियन आयडॉल 12 या शो च्या निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांचं कौतुक करा असे सांगिलतले होते',असे अमित कुमार म्हणाले होते. आता शो चे परिक्षक विशाल दादलानी (vishal dadlani) यांनी शो बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.(indian idol 12 vishal dadlani took big decision fans were shocked)

महाराष्ट्रामध्ये शूटिंगला परवानगी नसल्याने या शो चे शूटिंग दमण येथे सुरू होते. त्यावेळी दमणला जाण्यास नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी या परिक्षकांनी नकार दिला होता. त्यावेळी अनु मलिक आणि मनोज मुंताशिर यांनी या शो मध्ये परिक्षकाचे काम केले होते. 'इंडियन आयडॉल 12' शो चा सुत्रसंचालक आदित्य नारायणने सांगितले आहे की, 'विशाल दादलानी यांनी परत येण्यास नकार दिला आहे'. अशी चर्चा आहे की, जोपर्यंत लॉकडाउन संपत नाही तोपर्यंत विशाल शो मध्ये काम करणार नाही.

vishal dadlani,indian idol 12
बॉलीवूडमध्ये इनसायडर नाही, रति अग्निहोत्रींचा मुलगा म्हणाला...

विशाल सध्या त्यांच्या कुटुंबासोबत लोणावळ्याला येथे राहात आहेत. लोणावळ्यावरून दमणला जाणे आणि घरी परत येणे शक्य नसल्याचे विशाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोरोना होऊ शकतो असे त्यांनी शोमध्ये परत न येण्याचे कारण सांगितले आहे. काही दिसांपुर्वी या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने एका मुलाखतीत सांगितले, 'दमणमध्ये आमच्या टीमने चार दिवसांमध्ये आठ एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे.आमच्याकडे एक महिन्याचे पूर्ण एपिसोड आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अनलॉकच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. तोपर्यंत मुंबईमध्ये राहणे ठीक आहे असे मला वाटते.'

vishal dadlani,indian idol 12
कंगणा राजकारणात प्रवेश करणार ? भाजपच्या नेत्याचे संकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com