Indian Idol 12: 'या ट्रॉफीवर माझा हक्क नाही, कारण...'

'ट्रॉफी पाहून आनंद झाला नाही, कारण...'
Pawandeep Rajan
Pawandeep Rajan

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'इंडियन आयडॉल १२' चा Indian Idol 12 ग्रँड फिनाले सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात उत्तराखंडच्या पवनदीप राजनने Pawandeep Rajan आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांची मनं जिंकली आणि या पर्वाचं विजेतपद पटकावलं. विशेष म्हणजे पवनदीपला २५ लाखांचा धनादेश व एक कार बक्षीस म्हणून देण्यात आली. मात्र, हे विजेतेपद माझ्या एकट्याचं नाही. त्यामुळे ट्रॉफी पाहून मला आनंद झाला नाही, असं पवनदीपने एका मुलाखतीत सांगितलं. (indian-idol-12-winner-pawandeep-rajan-revealed-not-feeling-great-after-winning-the-show)

"इंडियन आयडॉल'च्या फायनलमध्ये गेल्यानंतर मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नव्हतो. पण एक नक्की माहित होतं की जो कोणी जिंकेल तो आमच्या मित्रपरिवारापैकीच एक असेल. कारण, इथे आमचं एक कुटुंबच तयार झालं होतं. पण, ज्यावेळी मला विजेतापदाची ट्रॉफी मिळाली त्यावेळी मला म्हणावा तसा आनंद झाला नव्हता. मला फार वेगळं वाटत होतं. कारण, या ट्रॉफीवर केवळ माझाच नाही तर आमच्या सगळ्यांचा हक्क होता. भविष्यात आम्ही सगळे एकमेकांसोबतच काम करु आणि या शोनंतर सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहू असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, असं पवनदीप म्हणाला.

पुढे तो म्हणाला, "फायनलच्या वेळी माझं कुटुंब, मित्रपरिवार असे बरेच जण इथे आले होते. पण, ज्यावेळी मी विजेतेपदाची ट्रॉफी हातात घेतली त्यावेळी माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं."

दरम्यान, इंडियन आयडॉल'च्या (Indian Idol 12) ग्रँड फिनालेमध्ये पवनदीप रंजनसोबत अरुणिता कांजिलाल, मोहम्मद दानिश, निहाल तौरो, सायली कांबळे आणि शण्मुखप्रिया हे स्पर्धक पोहोचले होते. मात्र, आपल्या आवाजाच्या जोरावर पवनदीपने श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावलं. या ग्रँड फिनालेमध्ये गायक सुखविंदर सिंग, मिका सिंग, अमित मिश्रा, कुमार सानू, जावेद अली, अल्का याग्निक, उदित नारायण या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com