Independence Day Special: शाहरुखच्या 'स्वदेस' मध्ये असं काय आहे खास?

स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन यानिमित्तानं मनोरंजन विश्वात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती केली गेली (bollywood Movies) आहे.
Independence Day Special news
Independence Day Special news esakal
Updated on

दर्शन टारे -

Swadesh Movie News: स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन यानिमित्तानं मनोरंजन विश्वात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती केली गेली (bollywood Movies) आहे. त्यामध्ये कित्येक बडया सेलिब्रेटींनी विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांना आगळ्या कलाकृतीचा आनंद दिला आहे. त्यात आशुतोष गोवारिकर लिखित आणि दिग्दर्शित स्वदेश या चित्रपटाचे आवर्जुन उल्लेख करावा (shahrukh khan) लागेल. भलेही बॉक्स ऑफिसवर स्वदेशला मोठं यश मिळालं नसेल. मात्र वेगळी वैचारिक भूमिका मांडणारी कलाकृती म्हणून त्याचे योगदान (bollywood actor) मोठे आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं आपण त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

पाश्चिमात्य देशात पॉप्युलर असलेल्या शाहरुख ची स्वदेस मधील NRI च्या भूमिकेसाठीची निवड अचूक ठरली होती. असं म्हटलं जातं की, स्वदेस ची कथा काही प्रमाणात 'रजनी बक्षी' यांच्या 'बापू कुटी : Journeys in Rediscovery of Gandhi' या पुस्तकातील गांधीजींच्या सुरवातीच्या जीवनावर (Personal Transformation Journey and Servant Leadership) वर बेतलेली आहे. स्वदेस च्या मुख्य पात्राचे नाव देखील 'मोहन' असने हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल.

९० च्या दशकामधे पाश्चिमात्य देशांमधे भारतीय लोकवस्ती वाढायला लागली आणि हिंदी चित्रपटांचे मार्केट परदेशात खुले झाले. त्याकाळात काही विशिष्ट थीम वर बेतलेले चित्रपट बनत होते. ज्यात प्रमुख्याने भारतीय संस्कृतीचे संदर्भ असलेले, नॉस्टॅल्जिया वर बेतलेले तसेच भावनिक साद घालणारे (इमोशनल रिटर्न टू मदरलँड) चित्रपट, गाणी उदा. DDLJ (घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे), परदेस (ये मेरा इंडिया) K३G, फिर भी दिल है हिंदुस्थानी, चक दे इंडिया आणि स्वदेस. यामधे अजून एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे 'शाहरुख खान'.

MBA चे शिक्षण घेताना Leadership वरच्या एका case study chya दरम्यान 'स्वदेस' मी पुन्हा पुन्हा पहिला. शांतपणे अनेक प्रकारे समजून घेता येतो. तो कशाप्रकारे हे आपण जाणून घेऊयात.. Robert K. Greenleaf यांनी Servant Leadership ची कन्सेप्ट मांडली होती. जगात २ प्रकारचे लीडर असतात पहिल्या प्रकारामध्ये ज्याला ट्रॅडिशनल लिडरशिप म्हणता येईल त्यामधे हिटलर, सद्दाम हुसेन, पुतीन,किम जोंग, चंगेज़ ख़ान हे येतात तर दुसऱ्या प्रकारामध्ये (Servant Leadership) ज्यामध्ये सत्ता मिळवण्यापेक्षा निःस्वार्थ हेतू ने मानवतेसाठी, सामाजिक अन्याया विरुद्ध उभे राहणारे, लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणारे लीडर मोडतात उदा. मदर तेरेसा, मार्टिन लुथर किंग, अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला आणि महात्मा गांधी.

स्वदेस च्या मोहन चा प्रवास Traditional Leadership कडून Servant Leadership कडे जाणारा आहे. नासा मधे Project Manager असणारा मोहन कावेरी अम्मा ला परत नेण्यासाठी भारतात येतो आणि आणि गावामधे असलेली सामाजिक विषमता, उच्च नीच भेदभाव, शिक्षणाविषयी असलेली उदासीनता, सामाजिक अन्याय हे पाहून व्यथित होतो. अंधारात राहायची सवय असलेल्या गावात वीज घेऊन येतो. गावकऱ्यांना आपसातले भेदभाव विसरून एकत्र आणतो.

केवळ गांधीच नाही तर स्वदेस ला रामायणाचे संदर्भ देखील आहेत . गावाचे नाव चरणपूर असून गावात राम आणि सीता यांच्या पावलांचे ठसे असल्याने चरणपूर नाव पडले. राम वनवासातून परत आला तसा मोहन अनेक वर्षांनी मातृभूमी मधे परत येतो तेव्हा बॅकग्राउंड ला 'आयो रे' ची सुंदर धून वाजते. कावेरी अम्मा औक्षन करून त्याचे स्वागत करतात. मोहन हा आदर्शवादी रामा सारखा आहे ज्याच्यासाठी कर्तव्य प्रथम येते. त्यासाठी तो गीता (जसा राम सीतेला) सोडून त्याचे कर्तव्य आधी पूर्ण करतो असे दाखवले आहे. पल पल है भारी हे संपूर्ण गाणे रामायणाचे चित्रण आहे जिथे सीतेची भूमिका गीताने केली आहे. त्या गाण्यानंतर मोहन रावणाचा वध करेल — गावातील अंधार दूर करेल (शब्दशः आणि रूपकदृष्ट्या). सामाजिक विषमता दूर करायची असेल तर आपल्या मनातील शत्रूला आधी दूर केलं पाहिजे हे मोहन गावकऱ्यांना पटवून देतो. जावेद अख्तर यांनी खूप सुंदर ओळ लिहिली आहे. "मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं"

Independence Day Special news
Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'

मोहन च्या तोंडी एक वाक्य आहे - "मैं नहीं मानता कि हमारा देश दुनिया का सबसे महान देश है. लेकिन ये जरूर मानता हूं कि हममें काबिलियत है, ताकत है इस देश को महान बनाने की. हम आपस में लड़ते रहते हैं, जबकि हमें लड़ना चाहिए अशिक्षा के खिलाफ, बढ़ती हुई आबादी के खिलाफ, भ्रष्टाचार के खिलाफ". स्वदेस वेगळा याकारणासाठी आहे कारण यामधे तत्कालीन सामाजिक परिथिती चे वास्तव दाखवले गेले तसेच तो दूर कारण्यासाठीचे आपले सक्रिय योगदान कसं असलं पाहिजे त्यासाठी चे प्रात्यक्षिक देखील दाखवले गेले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमोहोत्सवी आपण सर्वांनी आपसातील भेदभाव सोडून देऊन देशाला प्रगतीपथावर नेऊया हीच आपली खरी देशसेवा ठरेल.

भारत माता की जय !!!

Independence Day Special news
Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com