Malaika Arora:'या' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली चक्क मलायकाची जागा! केलं रिप्लेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora

Malaika Arora:'या' बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली चक्क मलायकाची जागा! केलं रिप्लेस

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मलायका हे मनोरंजन विश्वातलं सतत चर्चेत असणार नावं आहे. ती नेहमीच तिच्या फॅशनमुळे किंवा तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

त्याचबरोबर ती तिच्या आणि अर्जूनच्या नात्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. मात्र आज ती जरा वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ती आता लोकप्रिय शो टिव्हिवरील इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3चा भाग नसणार आहे.

सोनी टीव्हीचा डान्स रिअॅलिटी शो ' इंडियाज बेस्ट डान्सर ' हा सीझन 3 परतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आयबीडी हा शो करणारी बॉलीवूड मलायका अरोरा हा शो होस्ट करणार नाही आहे आता तिची जागा सोनाली बेंद्रे घेणार आहे .

आत्तापर्यंत हा शो मलायका अरोरा टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हे जज करत होते तर भारती सिंग आणि हर्ष हे दोघ या शोचे सूत्रसंचालन करत होते. पण आता मलायका या शोचा भाग असणार नाही. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सोनाली बेंद्रेबद्दल सांगायचे तर, सोनालीने याआधीही अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच डान्स शो जज करणार आहे.

सोनाली बेंद्रेचा हा पहिलाच रिअॅलिटी शो असेल, जिथे ती डान्सर्सना जज करताना दिसणार आहे. या शोचा भाग बनण्यासाठी ती फार उत्सूक आहे.

इंडियाज बेस्ट डान्सरचा सीझन 3 सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलची जागा घेणार आहे. हा शो 8 एप्रिलपासून शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा शो कोण होस्ट करणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इंडियाज बेस्ट डान्सरच्या ऑनलाइन ऑडिशन्स दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. देशभरातील लाखो डान्सर्सला शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी निर्मात्यांनी ऑनलाइन ऑडिशन्स घेतल्या होत्या. या ऑडिशनमध्ये निवडलेल्या स्पर्धकांची जजेस यांनी समोरासमोर आणखी एक फेरी घेतली होती. हा शो टिव्हिवरिल लोकप्रिय शोपैकी एक आहे.