
'बिग बॉस 16' विजेत्या MC Stanच्या शो ला बजरंग दलाचा दणका! मारहाण करत लाइव्ह शो केला रद्द
'बिग बॉस 16' चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन हा चर्चेचा विषय बनला आहे. 'बिग बॉस 16' चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. त्याची क्रेझ ही तरुण वर्गात प्रचंड आहे. मात्र त्याच्या कॉन्सर्ट संबंधित एक बातमी समोर आली आहे.
इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर बजरंग दलाने रॅपर स्टॅनला मारहाण केली आणि धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बातमीनंतर एमसी स्टॅनचे चाहते संतप्त झाले आहेत.
तर त्याच झालं असं की, 17 मार्च रोजी इंदूरमध्ये त्यांचा लाईव्ह शो होता. दरम्यान, बजरंग दलाच्या लोकांनी तिथे एकच गोंधळ घातला.
एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये महिलाबद्दल आक्षेपार्ह बोललं जातं त्याचबरोबर एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे तरुणाईवर याचा विपरित परिणाम होतो असा आरोप बजरंग दलाने त्याच्यावर केला आहे. त्यामुळे त्याचा हो लाईव्ह शो रद्द करण्यात आला असा दावा करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, एमसी स्टॅनचे चाहते ट्विटरवर त्याच्या सपोर्टमध्ये उतरले आहे. आता त्याच्यासाठी ट्विटरवर पब्लिक स्टँड्स विथ एमसी स्टॅन हा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.
त्याचबरोबर बजरंग दलाची माणसे मंचावर कशी पोहोचली, कोणत्याही सुरक्षा रक्षकाने त्यांना का रोखलं नाही? असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहे. त्याचबरोबर भारतात कलाकाराला योग्य मान आणि वागणुक मिळत नाही, असे अनेकजण म्हणत आहेत.
त्याचबरोबर या संदर्भात काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बजरंग दलाचे सदस्य धमक्या देताना दिसत आहेत. पण एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. इंदूरनंतर 18 मार्चला नागपुरात एमसी स्टेनचा लाईव्ह शो आहे.