Jeetendra Shastri : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' फेम जितेंद्र शास्त्री यांचे निधन

जितेंद्र शास्त्री हे हिंदी नाट्य वर्तुळातील मोठं नाव होतं, सिनेमातूनही त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी लोकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
India's Most Wanted Actor Jeetendra Shastri passed Away
India's Most Wanted Actor Jeetendra Shastri passed AwayGoogle
Updated on

Jeetendra Shastri Death: 'ब्लॅक फ्रायडे' पासून 'इंडियाज मोस्ट वॉंटेड' पर्यंत अनेक सिनेमांतून काम केलेले अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. हिंदी थिएटर ग्रुपमध्ये जितेंद्र शास्त्री यांना 'जीतू भाई' नावानं ओळखलं जायचं. जितेंद्र शास्त्री यांचा अभिनय खूप दमदार होता आणि त्यांनी अनेक सिनेमांतून भले छोट्या-छोट्या भूमिका केल्या असतील पण त्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा त्यांनी साकराल्या होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही.(India's Most Wanted Actor Jeetendra Shastri passed Away)

India's Most Wanted Actor Jeetendra Shastri passed Away
Tiger 3: आता 'ईद' ला नाही, 'या' सणाच्या दिवशी रिलीज होणार 'टायगर 3',सलमानचा मोठा निर्णय...

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण संपादन केलं होतं. नाट्यवर्तुळात ते खूप प्रसिद्ध होते. जितेंद्र यांनी 'कैद ए हयात' आणि 'सुंदरी' सारख्या दर्जेदार नाटकांमधून काम केले आहे. 'ब्लॅक फ्राय डे','दौड','लज्जा','चरस' सारख्या सिनेमांतूनही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सिनेमांत भले त्यांच्या भूमिका फार मोठ्या नसायच्या पण साकारलेल्या छोट्या-छोट्या भूमिकांमधून ते आपली छाप सोडायचे.

India's Most Wanted Actor Jeetendra Shastri passed Away
Box Office: बॉलीवूडला पुन्हा बसणार फटका? मोहनलालच्या 'Monster' नं सोडलं घाबरवून...

२०१९ मध्ये आलेल्या अर्जुन कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सिनेमातील त्यांची व्यक्तिरेखा ही नेपाळमधील एका गुप्तहेराची होती,जो भारताला एका कुख्यात दहशतवाद्याला पकडण्यासाठी मदत करत असतो. सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतूक झालं होतं.

सिने आणि टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनने(CINTAA) जितेंद्र शास्त्रींच्या निधनावर दुःख व्यक्त करीत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर श्रद्धांजलीचा एक मेसेज शेअर केला आहे. जितेंद्र यांचा फोटो शेअर करत सिंटानं लिहिलं आहे की,''तुमची खूप आठवण येईल जितेंद्र शास्त्री''.

जितेंद्र यांचे अभिनयातले सहकलाकार अभिनेते संजय मिश्रा यांनी जितेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर जितेंद्र यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ते दोघे बर्फानं वेढलेल्या पर्वतरांगात फिरत पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

व्हिडीओ शेअर करत संजय यांनी लिहिलं आहे,''जीतू भाई तू असतास तर बोलला असतास- मिश्रा कधी-कधी काय होतं ना मोबाईलमध्ये नाव राहतं पण माणूस नेटवर्कमधनं आऊट होतो. तुम्ही आता या जगात राहिला नाहीत,पण माझ्या मनात आणि विचारांच्या नेटवर्कमध्ये कायम रहाल''.

गंगाजल आणि लगान सिनेमातील अभिनेता यशपाल शर्मानं देखील सोशल मीडियावर जितेंद्र शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com