Box Office: बॉलीवूडला पुन्हा बसणार फटका? मोहनलालच्या 'Monster' नं सोडलं घाबरवून... Tollywood Movie Monster | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boxoffice clash of 'ajay devgan' Thank God, Akshay Kumar 'Ram Setu' and Mohanlaal 'Monster'

Box Office: बॉलीवूडला पुन्हा बसणार फटका? मोहनलालच्या 'Monster' नं सोडलं घाबरवून...

Box office:दिवाळीच्या शुभमुहर्तावर सिनेरसिकांसाठी सिनेमांची मेजवानी असणार आहे. वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे आपल्या भेटीस येत आहेत. एकीकडे जिथे ओटीटी वर काही सिनेमे आणि सिरीज रिलीज होणार आहेत तिथे दुसरीकडे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येण्यासाठी मेकर्सनी पूर्ण तयारी केली आहे. २५ ऑक्टोबरला अक्षयचा 'रामसेतू' आणि अजय देवगणचा 'थॅंक गॉड' रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार असल्यानं आधीपासूनच चर्चेत आहेत,त्या दरम्यान आता एका दाक्षिणात्य सिनेमानं देखील त्याच दिवशी रिलीज व्हायचं ठरवलंय असं कळतंय.(Boxoffice clash of 'ajay devgan' Thank God, Akshay Kumar 'Ram Setu' and Mohanlaal 'Monster')

हेही वाचा: Sonam Kapoor: 'करवा चौथ व्रत करण्यापेक्षा...', सोनम कपूर स्पष्टच बोलली

सुपरस्टार मोहनलाल ने आपला आगामी सिनेमा मॉन्स्टर च्या रिलीजची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडचं मोठं नुकसान दाक्षिणात्य सिनेमांमुळे होणार असं बोललं जात आहे.

हेही वाचा: Low Budget Movie: फक्त ९५ हजारात बनला सिनेमा, निर्मात्यानं मानधन म्हणून टीमला पैसे नाही तर दिले...

मोहनलालचा बोलबाला संपूर्ण देशात आहे, ना की फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत. परदेशातही लोक त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतात. दिवाळीच्या शुभप्रसंगी मोहनलालनं आपल्या आगामी 'मॉन्स्टर' सिनेमाच्या रिलीजची घोषणा केली आहे. सिनेमाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत मोहनलालनं रिलीज डेट २१ ऑक्टोबर सांगितली होती. आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की,''मॉन्स्टरला सेन्सॉर बोर्डाचं U/A सर्टीफिकेट मिळालं आहे. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जगभरात हा सिनेमा रिलीज होत आहे''.

हेही वाचा: KBC 14: 'चाहत्यांपासून दूर रहा', स्पर्धकानं सल्ला देताच त्यावर अमिताभचं उत्तर एक नंबर...

मॉन्स्टर एक क्राइम थ्रिलर आहे,ज्यात मोहनलाल सोबत लीना,हनी रोज,सिद्दीकी आणि सुदेव नायर असे महत्त्वाचे कलाकार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन वैसाखनं केलं आहे, सिनेमाचा ट्रेलर ९ ऑक्टोबरला रिलीज झाला होता. सिनेमात मोहनलाल लकी सिंग नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे,ज्याच्या मागावर पोलिस असतात. ट्रेलर पाहिल्यानंतर कळत आहे की सिनेमातील कथा एका खुन्याभोवती फिरते,जो दुसऱ्या मॉन्स्टरच्या शोधात असतो.

हेही वाचा: Nargis Fakhri: डिप्रेशनचा सामना करतेय 'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरी, बॉलीवूडवर आरोप करत म्हणाली...

काही दिवसांपूर्वीपर्यंत बॉक्सऑफिसवर चित्र होतं की,बॉलीवूडचे सिनेमे आपल्याच राज्यात अपयशी ठरत होते आणि साऊथचे सिनेमे हिंदी व्हर्जनमध्येही खोऱ्यानं कमाई करत होते. साऊथ सिनेमांनी जास्तकरुन बॉक्सऑफिसवर कमाल दाखवली,आणि बॉलीवूडचं त्यानं मोठं नुकसान झालं. अशामध्ये पुन्हा एकदा मॉन्स्टर मुळे रामसेतु आणि थॅंकगॉड च्या कलेक्शनवर वाईट परिणाम होणार का? हे सिनेमा रिलीज झाल्या नंतर स्पष्ट होईल.