Tiger 3: आता ईद ला नाही, 'या' सणाच्या दिवशी रिलीज होणार टायगर ३,सलमानचा मोठा निर्णय... Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan 'Tiger 3' New Release Date

Tiger 3: आता 'ईद' ला नाही, 'या' सणाच्या दिवशी रिलीज होणार 'टायगर 3',सलमानचा मोठा निर्णय...

Tiger 3 New Release Date: दिवाळीला काहीच दिवस उरले असताना सलमाननं मोठा धमाका केला आहे. त्यानं आपल्या टायगर ३ सिनेमाची रिलीज डेट बदलल्याची घोषणा केली आहे. 'टायगर 3' 2023 च्या एप्रिल मध्ये रिलीज केला जाणार होता पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचं कळत आहे. सलमान खानने 'टायगर 3' चा नवा लूक शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. 'टायगर 3' आता पुढील वर्षी दिवाळीला रिलीज केला जाणार आहे. चला,जाणून घेऊया 'टायगर 3' च्या नव्या पोस्टर विषयी आणि रिलीज डेट संदर्भात सर्व माहिती.

हेही वाचा: KBC 14: 'चाहत्यांपासून दूर रहा', स्पर्धकानं सल्ला देताच त्यावर अमिताभचं उत्तर एक नंबर...

टायगर फ्रॅंचायजीच्या तिसऱ्या भागात सलमान खानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. दोघांच्या या जोडीला प्रेक्षकांनीही भरपूर पसंत केलं आहे आणि पुन्हा या दोघांना एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. 'टायगर 3' च्या समोर आलेल्या नवीनलूकमध्ये सलमान खानचे फक्त डोळेच दिसत आहे.

हेही वाचा: Box Office: बॉलीवूडला पुन्हा बसणार फटका? मोहनलालच्या 'Monster' नं सोडलं घाबरवून...

गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान ईदच्या दिवशीच आपले सिनेमे रिलीज करत आला आहे,तसाच त्यानं पायंडा पाडला होता. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे थिएटर बंद होते त्यामुळे प्रेक्षकांना ईदला सलमानच्या सिनेमाचं गिफ्ट मिळालं नाही. पण लोकांना आशा होती पुढील वर्षी सलमान नक्कीच ईदला आपल्या सिनेमाचं सरप्राईज देईल पण तसं न करता सलमाननं प्रेक्षकांना नाराजच केलं आहे. 'टायगर 3' चे प्रदर्शन पुढे ढकलून सलमनानं निर्णय घेतला आहे की त्याचा 'टायगर 3' सिनेमा पुढील वर्षी दिवाळीला रिलीज केला जाईल.

सध्या मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचं कारण सांगितलेलं नाही. पण बोललं जात आहे की पोस्ट प्रॉडक्शन कामात उशीर होत असल्यानं मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला असावा.